घरमहाराष्ट्रनाशिक'३० वर्षांचा जुना इतिहास असलेल्या आपलं महानगरला नाशिककरांच्या शुभेच्छा'

‘३० वर्षांचा जुना इतिहास असलेल्या आपलं महानगरला नाशिककरांच्या शुभेच्छा’

Subscribe

गेल्या ३० वर्षांपासून मुंबईमध्ये निर्भीड पत्रकारीता करणारे दैनिक ‘आपलं महानगर’ने आता नाशिकमध्ये पुढचे पाऊल टाकले आहे. आज नाशिकमध्ये आपलं महानगरच्या नाशिक आवृत्तीचा प्रकाशन सोहळा पार पडला. या सोहळ्यात राज्याचे जलसंपदा आणि नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी आपलं महानगरचे स्वागत करत शुभेच्छा दिल्या आहेत.

‘३० वर्षांपासून पत्रकारितेत पाय रोवून घट्ट उभे असलेल्या आपलं महानगर दैनिकाच्या नाशिक आवृत्तीला हार्दिक शुभेच्छा!’, अशा शब्दांमध्ये राज्याचे जलसंपदा आणि नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी आपलं महानगरला शुभेच्छा दिल्या आहेत. आज आपलं महानगर दैनिकाच्या नाशिक आवृत्तीचा प्रकाशन सोहळा पार पडला. या कार्यक्रमामध्ये गिरीश महाजन बोलत होते. यावेळी त्यांनी ‘सत्ताधारी चुकत असतील, तर निश्चित त्यांचा कान धरा, पण चांगले काम केले तर त्याबद्दल कौतुकही करा’, असे म्हटले आहे. या प्रकाशन सोहळ्याला राज्याचे ग्रामविकास राज्यमंत्री दादाजी भुसे, नाशिक महापालिकेच्या महापौर रंजनाताई भानसी, ज्येष्ठ काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हेमंत टकले, मनसेचे ज्येष्ठ नेते प्रदीप पवार आदी मान्यवर उपस्थित होते. नाशिकच्या महाकवी कालिदास कलामंदिर याठिकाणी हा प्रकाशन सोहळा पार पडला.

‘सत्ताधारी चुकतील तेव्हा विरोध सहन करावा लागेल’

या प्रकाशन सोहळ्यात आपलं महानगरचे संपादक संजय सावंत यांनी सर्व मान्यवरांचे आभार मानले. त्याचबरोबर गिरीश महाजन यांना संबोधित करताना सावंत म्हणाले की, सत्ताधाऱ्यांशी आमची मैत्री आहे. परंतु, सत्ताधारी चुकले तर त्यांना आमचा विरोध सहन करावा लागेल. त्याचबरोबर आम्ही कुणाच्याही मागे लागणार नाही, आम्ही विकासाची पत्रकारिता करु, असे संजय सावंत म्हणाले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -