घरताज्या घडामोडीशैक्षणिक दाखले आता ऑनलाईन

शैक्षणिक दाखले आता ऑनलाईन

Subscribe

जिल्हा प्रशासनाची तयारी : आपले सरकार पोर्टलवर अर्ज करण्याचे आवाहन

करोनामुळे सुरू असलेल्या लॉकडाउनमुळे पुढील शैक्षणिक वर्ष कधीपासून सुरू होणार याबाबत अनिश्चितता असली तरी, ऐनवेळी प्रवेशासाठी आवश्यक असणार्‍या शैक्षणिक दाखल्यांसाठी होणारी गर्दी लक्षात घेता करोनाच्या पार्श्वभुमीवर जिल्हा प्रशासनाने यंदा नागरिकांना घरबसल्या ऑनलाईन पध्दतीने दाखले देण्याचा निर्णय घेतला आहे. याकरीता आपले सरकार पोर्टलवर नोंदणी करून नागरिकांनी घरबसल्या दाखले देण्यात येणार आहे. आपले सरकार पोर्टलवर खात्याची नोंदणी केल्यानंतर कुठल्याही नागरिकाला घरबसल्या दाखल्यासाठी अर्ज करता येईल. त्यामुळे आता विविध शासकीय दाखल्यांसाठी सेतू किंवा महा ई सेवा केंद्रात जाण्याची आवश्यकता राहणार नाही.

करोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव बघता सरकारने यंदा पहिले ते नववी तसेच 11 वी आणि प्रथम व द्वितीय वर्षाच्या परिक्षा रद्द करत विद्यार्थ्यांना पास करण्याचे आदेश शाळा-महाविद्यालयांना दिले. तर पदवीची परिक्षासंदर्भात अजूनही सरकारचे एकमत होउ शकलेले नाही. अशा परिस्थिती कोरोनाचा लढा दिर्घकाळ चालणार असल्याने टप्याटप्याने सर्व सेवा सुरळीत करण्यासाठी सरकार निर्णय घेत आहे. त्याचाच एक भाग म्हणून पुढील महिन्यापासून शाळा-महाविद्यालयांचे टाळे उघडण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. तसेच इयत्ता दहावी, बारावी परिक्षांच्या निकालाबाबतही अद्याप कोणतेही स्पष्टीकरण शिक्षण विभागाने दिलेले नाही. मात्र असे असले तरी, शैक्षणिक वर्ष सुरू झाल्यानंतर प्रवेशासाठी विद्यार्थ्यांसह पालकांची एकच तारांबळ उडते. महाविद्यालयीन प्रवेशाकरीता  जात प्रमाणपत्र, नॉन क्रिमिलेअर, रहिवासी प्रमाणपत्राची आवश्यकता असते. हे दाखले मिळविण्यासाठी विद्यार्थी तहसिल कार्यालय, सेतू कार्यालय, महा ई सेवा केंद्रावर गर्दी करतात. अद्याप करोनाचा धोका टळलेला नाही. त्यामुळे दाखले मिळविण्यासाठी केंद्रावर होणारी गर्दी लक्षात घेता करोनाचा संसर्ग वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे यंदा लॉकडाउनमध्येही नागरिकांना घरबसल्या दाखले मिळवता येणे शक्य होणार आहे. या प्रणालीमुळे केंद्रावर होणारी गर्दी टाळणे तर शक्य होईलच शिवाय दाखले मिळविण्यासाठी ऐनवेळी होणारी धावपळ टाळता येणे शक्य होणार आहे.

- Advertisement -

असे मिळतील दाखले
दाखले मिळवण्यासाठी नागरिक आपले सरकार पोर्टलवर ऑनलाइन अर्ज करू शकतात. त्यासाठीचे कागदपत्रे ऑनलाइनच सादर करायची आहेत. डिजिटल सहीने नागरिकांना दाखला मिळणार आहे. दरदिवशी दाखल्यांसाठी ऑनलाइन किती अर्ज आले, किती प्रलंबित आहेत, किती जणांना दाखले मिळाले, याची सर्व माहिती ऑनलाइन उपलब्ध होणार आहे. त्यावर तहसीलदार व संबंधित अधिकार्‍यांचे नियंत्रण राहणार आहे. दाखल्याचा अर्ज व त्यासोबत कागदपत्रे परिपूर्ण दिल्यानंतर ऑनलाईन दाखले मिळणार आहे. तसेच दाखल्यांची सद्यस्थितीही याव्दारे अर्जदाराला कळू शकेल त्यामुळे त्यांना दाखले मिळविण्यासाठी कार्यालयात हेलपाटे मारण्याची आवश्यकता राहणार नाही.

करोनाचा वाढता धोका लक्षात घेता विद्यार्थ्यांना आपले सरकार पोर्टलवर घरबसल्या दाखले मिळवता येणार आहे. दाखले काढण्यासाठी केंद्रावर होणारी गर्दी यामुळे सोशल डिस्टंसिंगचे नियम पाळणे शक्य होणार नाही तसेच दाखल्यांसाठी कागदपत्रांची हाताळणी करावी लागत असल्याने धोका निर्माण होउ शकतो. त्यामुळे विद्यार्थी, नागरिकांनी आपले सरकार पोर्टलव्दारेच अर्ज करावेत. अद्याप दहावी, बारावी परिक्षांचे निकालांबाबत स्पष्टीकरण नाही. मात्र विद्यार्थ्यांची तारांबळ होउ नये याकरीता ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

- Advertisement -

-डॉ. अरविंद अंतुर्लीकर, उपजिल्हाधिकारी (प्रशासन).

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -