अंबड पोलीस स्टेशनच्या लाचखोर पोलीस हवालदाराला अटक

व्यावसायिकाकडून ५ हजार रूपयांची लाच घेणाऱ्या मल्ले याला अँटी करप्शनने केली अटक

Ambad corruption trapped

व्यावसायिकाकडून ५ हजार रूपयांची लाच घेणाऱ्या अंबड पोलिस स्टेशनच्या पोलीस हवालदार भास्कर मल्ले याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने गुरुवारी (दि.१०) अटक केली.

पोलीस हवालदार मल्ले यांची नेमणूक अंबड पोलीस ठाण्यात आहे. पोलीस ठाणे हद्दीतील एका व्यावसायिकाकडे मल्ले यांनी १० हजार रूपयांची लाच मागितली होती. तडजोडीअंती गुरुवारी ५ हजार रूपये देण्यावर एकमत झाले. दरम्यान,  तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे यासंदर्भात तक्रार केली होती. त्यानुसार विभागाच्या पथकाने सापळा रचला. तक्रारदाराकडून लाच घेताना या पथकाने पोलीस हवालदार मल्ले यांना अटक केली.