घरमहाराष्ट्रनाशिकमाणिकराव कोकाटेंना अँटी करप्शनची नोटीस

माणिकराव कोकाटेंना अँटी करप्शनची नोटीस

Subscribe

राजकीय सूडबुद्धीतून सरकारने कारवाई केल्याचा अॅड. कोकाटेंचा आरोप

भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष आणि पक्षीय विरोधानंतर लोकसभा उमेदवारीसाठी अपक्ष निवडणूक लढविण्यावर ठाम असलेल्या अॅड. माणिकराव कोकाटे यांना अपसंपदेच्या कारणावरुन अँटी करप्शन ब्युरोने (लाचलुचपत प्रतिबंधक विभाग) नोटिस बजावली आहे. दरम्यान, ही नोटिस म्हणजे सरकारने सूडबुद्धीतून केलेली कारवाई असल्याचा आरोप अॅड. कोकाटेंनी केली.

महायुतीकडून हेमंत गोडसे यांचे नाव जाहीर झाल्यानंतरही गोडसेंविरोधात बंड पुकारत कोकाटे लोकसभा निवडणुकीच्या मैदानात उतरले. त्यांच्या माघारीसाठी ‘संकटमोचका’पासून ते मुख्यमंत्र्यांपर्यंत सर्व पातळ्यांवर जोरदार प्रयत्न सुरू असतानाही, कोकाटे माघार घ्यायला तयार नाहीत. त्या पार्श्वभूमीवर पाच वर्षांपूर्वीचे प्रकरण उकरून काढल्याचे सांगितले जाते आहे.

- Advertisement -

‘सरकारने कोकाटेंना ओळखले नाही’

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या नोटिशीबाबत बोलताना कोकाटे म्हणाले की, २०१४ मध्ये ही कारवाई झाली होती. त्यावेळी मी स्वतः त्या वेळचे अँटी करप्शन विभागाचे महासंचालक आणि तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील यांना पत्र लिहून तत्काळ चौकशी सुरू करावी, अशी विनंती केली होती. चौकशी सुरू झाल्यानंतर मी हवी ती सर्व माहिती पुरविली होती. त्यासाठी आवश्यक कागदपत्रेही सादर केली. त्यानंतर गेल्या दोन वर्षांत फार काही पाठपुरावा झाला नाही. सोमवारी अचानक कागदपत्रांमध्ये त्रुटी असून पूर्ततेची नोटीस आली. मी लोकसभेचा उमेदवार असल्याने लगेचच माहिती देणे शक्य होणार नाही. निवडणूक प्रक्रिया संपल्यानंतर हवे ते कागदपत्रे सादर केली जातील, असे मी सांगितले. माझ्या माघारीसाठी खूप प्रयत्न सुरू आहेत. मात्र, माघार घेणार नाही असे लक्षात येताच सरकारने सूडबुद्धीने ही कारवाई केली. नोटिस काढली तर माघार घेतील, असे सरकारला वाटते आहे. मात्र, सरकारने सरकारने कोकाटेंना ओळखले नाही. मी धमक्यांना बळी पडणार नाही.निवडणूक लढणार आणि जिंकणार,

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -