नाशिक : त्र्यंबकनाका सिग्नलवर अपघात

एसटीने 2 दुचाकी आणि 2 चारचाकी वाहने उडविली; एकजण गंभीर जखमी, वाहतुकीचा 1 तासापासून खोळंबा

Nashik

शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी त्रंबक नाका सिग्नलवर आज दुपारी सव्वा तीन वाजेच्या सुमारास महामंडळाच्या बसने दोन दुचाकी आणि दोन चार चाकी वाहनांना धडक दिली. अपघातमध्ये एक गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार चालू आहेत. दरम्यान, एक तासापासून वाहतूक खोळंबली असून घटनास्थळी वाहतूक पोलिस वाहतूक मोकळी करत आहेत.ही बस रावेर ते ठाणे या मार्गावरील असून बदली ड्रायव्हर गाडी घेऊन निघाला असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. ठक्कर बाजार येथून निघणार्‍या पुणे औरंगाबाद बुलढाणा यासारख्या बाहेरगावच्या गाड्या उशिराने निघण्याची शक्यता आहे.

घटनास्थळी परिवहन महामंडळाचे अधिकारी दाखल झाले असून घटनेची तपासणी करत आहेत. बस आणि नागरिक सरकारवाड्यात पोहचले असून पुढील तपस सरकारवाड्याचे पोलिस अधिकारी करत आहे.


हे देखील वाचा – महंत सुधीरदास यांची दुबईतून सुटका