घरमहाराष्ट्रनाशिक२०१९ वर्षात अपघाती मृत्यू घटले

२०१९ वर्षात अपघाती मृत्यू घटले

Subscribe

२०१८ च्या तुलनेत अपघातांची संख्या कमी

आवश्यक उपाययोजनानंतर रस्ते अपघातांचा आलेख काही प्रमाणात कमी होऊ लागला आहे. नाशिक पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत सन २०१८ मध्ये जानेवारी ते ऑक्टोबर या दहा महीन्यांच्या कालावधीत १६६ जणांचा मृत्यु झाला. यावर्षी याच दहा महिन्यांत १४० जणांना जीव गमवावा लागला आहे. तुलनेने यंदा अपघात आणि मृत्यूच्या संख्येत घट झाल्याचा दावा प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांमार्फत करण्यात आला आहे.

…म्हणून अपघातांची संख्या कमी झाली

रस्ते अपघातांची संख्या कमी करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश असून या आदेशानंतर वाहतूक पोलिस, आरटीओ तसेच इतरही यंत्रणा कामाला लागल्या. तातडीने आवश्यक कामेही हाती घेतली असून प्रत्येक महिन्याला बैठक आयोजित करून कामांचा आढावा घेतला जात आहे. रस्ते अपघाताला वाहनचालकांची चूकही कारणीभूत असून काही वेळेला रस्त्यावरील खड्डे तसेच इतरही कारणांमुळे अपघात होत असतात. अपघातात हकनाक कोणाचा बळी जाणार नाही, यासाठी आवश्यक ती पावले उचलण्यात येत असून वाहतूक नियमांचे उल्लंघन करणार्‍या चालकांविरुद्ध वाहतूक पोलिसांकडून कारवाईचा बडगा उगारण्यात येत आहे. याचाच परिणाम म्हणजे रस्ते अपघातांची संख्या कमी झाली आहे.

- Advertisement -

नाशिक पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत सन २०१८ मध्ये जानेवारी ते ऑक्टोबर या कालावधीत १६६ प्राणघातक अपघात घडले होते. तर, गंभीर अपघांतात मृतांची संख्या ४६९ इतकी आहे. गतवर्षी २०१८ मध्ये ही संख्या ४६१ इतकी होती. ग्रामीण भागात सन २०१८ मध्ये १०६६ गंभीर अपघात घडले. यंदा याच कालावधीत १०२९ अपघात घडल्याची नोंद करण्यात आली आहे. पोलीस आणि आरटीओकडून वारंवार करण्यात येणाऱ्या कारवाईमुळे हे प्रमाण घटल्याचा दावा आरटीओकडून करण्यात आला आहे.

अनधिकृत कट पॉईंट करणार बंद

शहर, ग्रामीण भागातील रस्त्यांवर काही विशिष्ट ठिकाणी वारंवार होणारया अपघातांचा धोका संपुष्टात आणण्यासाठी रस्ता सुरक्षा समितीने जिल्हयात विविध मार्गावर सर्वेक्षणांती निश्चित करण्यात आलेल्या ब्लॅक स्पॉट अर्थात अपघातप्रवण क्षेत्रांवर तातडीने उपायोजनां राबविण्याचे निर्देश जिल्हाधिकारयांनी दिले होते. त्यानूसार संबधित क्षेत्रात पटटे मारूणे, सूचना फलक बसवणे, रिफलेक्टर बसविणे आदि उपाययोजना हाती घेण्यात आल्या. मात्र अनेक ठिकाणी काही हॉटेल व्यावसायिकांकडून अनधिकृतपणे चुकिच्या ठिकाणी दुभाजकात जागा ठेवली जात यामुळे अपघात घडत असल्याचे समोर आले असे स्पॉट सर्वेक्षण करण्यात येवून संबधितांवर कारवाई करण्यात येणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.

- Advertisement -

‘ब्लॅक स्पॉट’ चे सर्वेक्षण पूर्ण

एखाद्या रस्त्यावरील ५०० मीटरच्या पट्टयात तीन वर्षांत पाच अपघात झाले असतील आणि त्यामध्ये १० जणांचा मृत्यू झाला असल्यास ते अपघाती क्षेत्र अर्थात ‘ब्लॅक स्पॉट’ मानले जाते. ही ठिकाणे शोधण्यासाठी प्रत्येक पोलीस ठाण्यांकडील अपघातांची माहिती घेण्यात आली. त्याआधारे अपघात नेमक्या कोणत्या ठिकाणी झाले, याची माहिती संकलित करण्यात आली. उपरोक्त निकषानुसार ब्लॅक स्पॉट निश्चित झाल्यानंतर त्या ठिकाणी ज्या यंत्रणेच्या अखत्यारीत तो मार्ग आहे, त्यांच्या समवेत संबंधित ठिकाणांची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली. अपघाताच्या कारणांचा शोध घेऊन तो धोका कमी करण्यासाठी त्या त्या ठिकाणी काय उपाय करण्याची गरज आहे, याचा प्रत्येक अपघात प्रवण क्षेत्रनिहाय स्वतंत्रपणे अभ्यास करण्यात आला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -