घरमहाराष्ट्रनाशिक‘टॉपटेन’ गुन्हेगार रडारवर; तडीपारीची कारवाई होणार

‘टॉपटेन’ गुन्हेगार रडारवर; तडीपारीची कारवाई होणार

Subscribe

पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांची माहिती, गुन्हेगारीवरील नियंत्रणासाठी परप्रांतीयांची कुंडली तयार करणार

शहरातील गुन्हेगारांवर वचक ठेवण्यासाठी ‘एनपीडीए’ अंतर्गत पाच गुन्हेगारांवर कारवाई करण्यात आली आहे. टॉप टेन गुन्हेगारांची चेकलिस्ट तयार करण्यात आली आहे. त्यांच्यावर ‘एनपीडीए’ ५५ अंतर्गत तडीपारीची कारवाई केली जाणार आहे, अशी माहिती पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.

नांगरे-पाटील म्हणाले, गुन्हेगारी आटोक्यात आणण्यासाठी नियोजनबद्ध प्लॅन तयार करण्यात आला आहे. प्रत्येक पोलीस ठाण्यात पाच बीट मार्शल नेमण्यात आले आहेत. पोलीस ठाणेनिहाय पूर्वी दोन बीट मार्शल असायचे. आता प्रत्येक पोलीस ठाणेनिहाय तीन दुचाकी वाहने, तीन मोबाईल व्हॅन देण्यात आल्या आहेत. शहरात विविध ठिकाणे ३९ स्टॅपिंग व्हॅन लावण्यात आलेल्या आहेत. पोलीस ठाणेनिहाय आधी ३० क्यूआर (क्विक रिस्पॉन्स) कोड होते. ते आता प्रत्येक पोलीस ठाण्याच्या हद्दीत १०० क्युआर कोड करण्यात आले आहेत. दर दोन तासाला क्यूआर कोडची तपासणी केली जात असून, त्यातून पोलिसिंग वाढवण्याचा प्रयत्न केला जात आहे. १६ ते १८ वयोगटातील मुलांचा गुन्हेगारी कृत्यांसाठी वापर केला जात असल्याचे आढळून आले. त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.

- Advertisement -

माझ्या नावाने मेसेज खोटे

माझ्या नावाने सोशल मीडियावर व्हायरल होत असलेले मेसेजपैकी मी एकही पाठवलेला नाहीत. त्यातील एकही मेसेज खरा नाही. याप्रकरणी अनेकवेळा खुलासा केलेला आहे. माझ्या नावाने १९ ग्रुप तयार करण्यात आले होते. ते मी बंद केले आहेत. माझे सोशल मीडियावर एकही अकाउंट नाही. याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. पोलिसांनी फेसबूक आणि यू ट्युबवरील व्हिडिओ डिलीट केलेले आहेत, असा खुलासा नांगरे-पाटील यांनी केला.

सुरक्षेकडे दुर्लक्ष केल्यास कारवाई

बँका व फायनान्स कंपन्यांनी सुरक्षेस प्रथम प्राधान्य दिले पाहिजे. त्यांनी दुय्यम स्थान देऊ नये. सुरक्षेकडे दुर्लक्ष करणार्‍या बॅका व फायनान्स कंपन्यांविरोधात कठोर कारवाई केली जाणार आहे. पोलीस दल सर्वांच्या सुरक्षेसाठी तत्पर आहे. पोलिसांकडून नाकाबंदी, पेट्रोलिग केली जात आहे. सिक्युरिटी कंपन्यांना सुरक्षेसाठी बंदुक लायसन्स परवाना दिला जाईल. त्याचे प्रशिक्षण सुरक्षारक्षकांनासुद्धा दिले जाईल, अशी माहिती नांगरे-पाटील यांनी केली.

- Advertisement -

परप्रांतीयांची कुंडली तयार

नांगरे-पाटील म्हणाले, अंबड, उपनगर, सातपूर येथे भाड्याने परप्रांतीय नागरिक मोठ्या संख्येने राहतात. या ठिकाणी प्रत्येक वॉर्डमध्ये १०० लोकांची झोपडपट्टी पंचायत भरवली जाणार आहे. त्यातून प्रत्येक बीटनिहाय व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप बनवत गुन्हेगारांची कुंडली तयार केली जात आहे. शहरात २१ पोलीस चौक्या कार्यान्वित करण्यात आलेल्या आहेत. या ठिकाणी पोलीस असणार आहेत. दोन महिन्यांपासून बी रोल पद्धतीने कामास सुरुवात केली आहे. बिहार, उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश येथील कामगार नाशिकमध्ये असतील, तर त्यांच्या मूळ पत्यावर पोलीस जातात. कामगारावर काही गुन्हे दाखल आहेत का, गुन्हेगारी पार्श्वभूमीची माहिती घेतली जात आहे. हाउसिंग सोसायटीसह झोपडपट्टी व चाळींमध्ये भाड्याने राहणार्‍या लोकांची माहिती पोलीस ठाण्यास दिली पाहिजे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -