९७ हज यात्रेकरूंना सव्वादोन कोटींचा गंडा

सौदी अरेबियामधील हज-उमराह यात्रेसाठी बुकिंग केलेल्या विविध शहरांमधील शेकडो यात्रेकरूंना जहान इंटरनॅशनल टूर्स अ‍ॅण्ड ट्रॅव्हलर्स कंपनीने ९७ यात्रेकरूंची सुमारे २ कोटी २४ लाख ८८ हजार रुपयांची फसवणूक केल्याचे प्रकरण पुढे आले आहे.

Nashik
Fraud
हज यात्रेकरूंना सव्वादोन कोटींना गंडा

सौदी अरेबियामधील हज-उमराह यात्रेसाठी बुकिंग केलेल्या विविध शहरांमधील शेकडो यात्रेकरूंना जहान इंटरनॅशनल टूर्स अ‍ॅण्ड ट्रॅव्हलर्स कंपनीने ९७ यात्रेकरूंची सुमारे २ कोटी २४ लाख ८८ हजार रुपयांची फसवणूक केल्याचे प्रकरण पुढे आले आहे. याप्रकरणी मुंबई नाका पोलिसांनी ९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शकील गणी सय्यद (५२, रा. आडगाव) यांनी २०१८ मध्ये वडाळारोडवरील जहान इंटरनॅशनल टूर्समार्फत हज-उमराह यात्रेला जाण्यासाठी आपल्या कुटुंबातील पाच सदस्यांचे एकूण साडेसात लाख रुपये भरले होते. याचप्रकारे शेकडो नागरिकांनी हज यात्रेसाठी या कंपनीकडे पैसे भरून बुकींग केली होती. टूर्सचे संचालक संशयित अब्दुल मतीन मनियार, समीर शमशुद्दीन मनियार, अजीज बनेमियाँ मनियार, शाहरूख जुनेद मनियार, अमजद करीम मनियार, शकील बनेमियाँ मनियार, मुस्तकीम गणी मनियार, अझहर अयाज मनियार आणि सोहील शेख यांनी संगनमताने कट-कारस्थान रचून यात्रेकरूंची फसवणूक केली. जिल्ह्यातील ९७ नागरिकांनी फसवणुकीबाबत पोलिसांकडे धाव घेतली आहे. २०१६ ते २०१८ या कालावधीत झालेल्या या घोटाळ्यात कोट्यवधींची फसवणूक झाली असून, तक्रारदारांसह ही रक्कमही वाढण्याची शक्यता वर्तविली जाते आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here