कमी वेळ अन कमी खर्चात जलद न्यायाचे उद्दीष्ट ठेवा – न्यायमूर्ती भूषण गवई

Nashik

न्याय हा भारतीय राज्यघटनेशी सुसंगत असला पाहिजे. न्यायव्यवस्थेचे विकेंदीकरण झाले पाहिजे. न्याय आणि निकाल यात फरक आहे. न्याय हा राज्यघटनेशी सुसंगत असला पाहिजे. कमी वेळात न्याय देतानाच तो परवडणाराही असला पाहीजे. कमी वेळात आणि कमी खर्चात न्याय हेच उदिदष्ट ठेवले पाहिजे, असे प्रतिपादन सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई यांनी केले.
महाराष्ट अ‍ॅँड गोवा बार कौन्सिल आणि नाशिक बार असोसिएशनतर्फे आयोजित राज्यस्तरीय वकील परिषदेत रविवारी (दि.१६) सकाळच्या सत्राचा समारोप ते बोलत होते. न्यायमूर्ती एच. आर. खन्ना यांच्या नावाने साकारलेल्या सभागृहातील परिषदेस पमुख पाहुणे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे उपस्थित होते. यावेळी व्यासपीठावर परिवहन मंत्री अनिल परब, नाशिकच्या पालक न्यायमूर्ती अनुजा प्रभुदेसाई, मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश मकरंद कर्णिक, न्यायाधीश संदिप शिंदे, भारताचे अतिरिक्त महाधिवक्ता ए. एन. एस. नाडकर्णी, राज्याचे महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी, सर्वोच्च न्यायालयातील वरिष्ठ वकील शेखर नाफडे, खासदार हेमंत गोडसे आदी उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते नवीन इमारतीचे भूमिपूजन व कोनशिला अनावरण करण्यात आले.  यावेळी महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिलचे पदाधिकारी सुभाष घाटगे, अमोल सावंत, पारीजात पांडे यांच्या हस्ते पाहुण्याचा सत्कार करण्यात आला. परिषदेचे समन्वयक जयंत जायभावे यांनी आयोजनामागील भुमिका विशद केली. नाशिक बार असोशिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. नितीन ठाकरे यांनी प्रास्ताविक केले. तर महाराष्टल अ‍ॅँड गोवा बार कौन्सिलचे अध्यक्ष अ‍ॅड. अविनाश भिडे यांनी आभार मानले.

२६ ज्येष्ठ वकिलांचा गौरव
न्यायदानाच्या क्षेत्रात चाळीस वर्षांपेक्षाही अधिक काळ काम करणार्‍या राज्यातील २६ वकीलांचा यावेळी सत्कार करण्यात आला. त्यांना वरिष्ट वकील म्हणून गौरवण्यात आले. सत्कारार्थी वकील पुढीलप्रमाणे-जेष्ठ विधीज्ञ अ‍ॅड. भास्कर आव्हाड, अ‍ॅड. बापूसाहेब परूळेकर, अ‍ॅड. प्रेमसुखलाल संचेती, अ‍ॅड.अब्दूल रहेमान, अ‍ॅड.सुहास मिसर, अ‍ॅड. श्रीकृष्ण दानवे, अ‍ॅड.हिरकचंद गांधी, अ‍ॅड. उत्तम मराठे, अ‍ॅड. मारोत गडकरी, अ‍ॅड. जयसिंग पाटील, अ‍ॅड. श्रीकांत गडकरी, अ‍ॅड. नारायण कुलकर्णी, अ‍ॅड. गोविंद अलनुरे, अ‍ॅड. मनजुला राव, अ‍ॅड. अंन्चलेतो विगॅस, अ‍ॅड. अभय पाटील, अ‍ॅड. निवृत्ती कोकाटे, अ‍ॅड. मोहन जाधव, अ‍ॅड. बालाजी भोसले, अ‍ॅड. केशव चौधरी, अ‍ॅड. शिवाजी जगताप, अ‍ॅड. निल्कनाथ हुड, अ‍ॅड. बाबा करेकर, अ‍ॅड. उदय ढगे, अ‍ॅड. सुरेंद्र गुलेक्स, अ‍ॅड. मोहन मानकर.