घरमहाराष्ट्रनाशिककोकणच्या हापूसची परदेशवारी लासलगावमार्गे सुरू

कोकणच्या हापूसची परदेशवारी लासलगावमार्गे सुरू

Subscribe

नीलेश बोरा, लासलगाव

जगभरातील खवय्यांना भुरळ घालणारा कोकणचा हापूस आंब्याची परदेशवारीही लासलगावमार्गे सुरू झाली आहे. मधूर असलेला आंबा जगातील अनेक देशांमधील ग्राहकांच्या जिभेवर आपले राज्य करत आहे. यासाठी भारतातील नऊ राज्ये यंदा आंबा निर्यातीसाठी सज्ज झाली आहे. देशातील आंबा उत्पादकांनी निर्यातीसाठी २९ हजार ९९ प्लॉटची नोंदणी केली आहे. यात सर्वाधिक कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि महाराष्ट्र आघाडीवर आहे. लासलगाव येथील कृषक मधून हापूस, केशर, पायरी, असा १०० मेट्रिक टन आंबा हा २७ हजार बॉक्स मधून अमेरिकेतील खवय्यांसाठी पाठविण्यात आला आहे.

- Advertisement -

१० एप्रिल २०१९ पासून येथील कृषक मधून आंब्यावर विकिरण प्रक्रिया केली जात असून त्यानंतर या आंब्याची निर्यात केली जात आहे, अशी माहिती प्रणव पारेख, महेंद्र अवधाने, संजय आहेर यांनी दिली. येथील डॉ. भाभा अणू संशोधन केंद्राच्या ‘कृषक’मधून यंदाच्या हंगामात आतापर्यंत १०० मेट्रीक टन आंब्यावर विकिरण प्रक्रिया करून तो अमेरिकेला रवाना झाला आहे. आपल्या अवीट चवीने जगभरातील खवय्यांना भुरळ पाडणारा हापूस आंबा लवकरच ऑस्ट्रेलियातही प्रवेश करण्याच्या मार्गावर आहे. यंदा नेहमीच्या तुलनेत निर्यात विस्तारणार असल्याचे चित्र आहे.

२१ विविध निकषांचे अडथळे पार

काही वर्षांपासून हापूस व इतर आंबे अमेरिकेला निर्यात केले जात आहेत. अमेरिकेच्या बाजारात कोणत्याही कृषी मालास प्रवेश करावयाचा असेल तर त्याला प्रथम २१ विविध निकषांचे अडथळे पार करावे लागतात. त्यात तो माल किटाणू विरहित असणे सर्वात महत्वाचे आहे. याकरता आंब्यावर विकिरण प्रक्रिया करणे बंधनकारक असल्याने भाभा अणू संशोधन केंद्राने येथे खास केंद्राची उभारणी केली. आंब्याची जागतिक बाजारपेठ विस्तारण्याच्या उद्देशाने या केंद्राची धुरा काही काळ राज्य कृषी पणन मंडळाने स्वीकारली. सध्या अ‍ॅग्रो सर्ज इरिडेशन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीद्वारे खासगी तत्वावर आंबा निर्यातदारांना सेवा पुरवत आहे. येथे विकिरण प्रक्रिया करून आंबे अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्को, लॉस एन्जलिस, शिकागो, न्यू जर्सी, कॅलिफोर्निया, न्यूयॉर्क शहरांमध्ये पाठवले जात आहेत.

- Advertisement -

या राज्यातून आंब्याची निर्यात

महाराष्ट्र : हापूस, केसर, पायरी
आंध्र प्रदेश : बैगनपल्ली, सुवर्णारेखा, नीलम, तोतापुरी,
गुजरात : केसर, हापूस, राजापुरी, जमादार, तोतापुरी, नीलम, दशहरी, लंगडा
मध्यप्रदेश : बॉम्बे ग्रीन, हापूस, दशहरी, फाजील, लंगडा, नीलम

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -