घरमहाराष्ट्रनाशिकपोलिस उपनिरीक्षकानेच केले अपहरण व लूटमार

पोलिस उपनिरीक्षकानेच केले अपहरण व लूटमार

Subscribe

पंचवटीतील एका व्यापाऱ्याला मध्यरात्री ताब्यात घेऊन त्याच्या कारखान्यावर नेत मारहाण व लूट करणाऱ्या पंचवटी पोलिस ठाण्यातील एका पोलिस उपनिरीक्षकाला पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी निलंबित केले आहे.

पंचवटीतील एका व्यापाऱ्याला मध्यरात्री ताब्यात घेऊन त्याच्या कारखान्यावर नेत मारहाण व लूट करणाऱ्या पंचवटी पोलिस ठाण्यातील एका पोलिस उपनिरीक्षकाला पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी निलंबित केले आहे. दबाव आणून व्यापाऱ्यास जबाब बदलण्यास भाग पाडणाऱ्या पोलिस उपनिरीक्षक दीपक गिरमे यांच्यासोबतच त्याला मदत करणाऱ्या सर्वांची आयुक्तांनी सखोल चौकशी करण्याची मागणी केली जाते आहे. गिरमे यांच्यावरील या कारवाईने पोलिस वर्तुळात मात्र मोठी खळबळ उडाली आहे.

पंचवटीच्या टकलेनगरमधील व्यावसायिक मयूर वसंत सोनवणे (३३) यांच्या राहत्या घरी मंगळवारी, ७ मे रोजी मध्यरात्री पंचवटी पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक दीपक गिरमे, शिपाई सागर पांढरे हे त्यांच्या खासगी गाडीने गेले. काहीही कारण न देता या दुकलीने सोनवणे यांना जबरदस्तीने ताब्यात घेत गाडीत बसवून आडगाव येथील सोनवणे यांच्या कारखान्यात पोहोचले. या ठिकाणी दुकलीने मयूर यांना मारहाण केली. या वेळी गिरमे व पांढरे यांनी मयूर यांच्याकडील ६० हजारांची रोकडही हिसकावून घेतली, अशी तक्रार सोनवणे यांनी आडगाव पोलिसांकडे केली होती. मात्र, आडगाव पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याऐवजी सोनवणे यांनाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करत त्यांचा जबाब बदलवून घेतला व त्यावर सोनवणे यांची बनावट सही करत दुकलीच्या बाजूने पुरावा तयार केला.

- Advertisement -

या सर्व प्रकाराबाबत मयूर सोनवणे यांनी पोलिस आयुक्तांची भेट घेत खरी परिस्थिती सांगितली. त्यावर त्यांनी तत्काळ पोलिस उपायुक्तांना या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले. आठवडाभरात चौकशी पूर्ण झाल्यानंतर गिरमे यांच्यावर आर्थिक लूटमारीचा ठपका ठेवण्यात आला. त्यानंतर नांगरे-पाटील यांनी गिरमे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्याचे आदेश दिले.

गिरमेंची वादग्रस्त कामगिरी

धमक्या देणे, पैशांसाठी तगादा लावणे, ताब्यातील आरोपी फरार होणे अशा एक ना अनेक प्रकारांमुळे गिरमे यांचे ‘कर्तव्य’ नेहमीच वादग्रस्त राहिलेले आहे. पोलिस आयुक्तपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर नांगरे-पाटील यांनी जेव्हा पंचवटी पोलिस स्टेशनला भेट दिली तेव्हाही गिरमेंचा कारभार चव्हाट्यावर आला होता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -