घरमहाराष्ट्रनाशिकअपना घर दुर्घटना : मृत मजूर कुटुंबियांना ना भरपाई ना काम

अपना घर दुर्घटना : मृत मजूर कुटुंबियांना ना भरपाई ना काम

Subscribe

कामगार उपायुक्तांकडून कामगार न्यायालयात दावा दाखल

अपना घर या बांधकाम प्रकल्पावर टाकी कोसळून गेल्या मंगळवारी (दि.2) झालेल्या अपघातात मृत झालेल्या चार मजुरांच्या नातलगांना बांधकाम व्यवसायिकाकडून भरपाई मिळावी, यासाठी कामगार उपायुक्तांकडून कामगार न्यायालयात दावा दाखल केला आहे. मात्र, घटना घडल्यापासून काम बंद असल्याने मजुरांवर उपासमारीची वेळ आली आहे.
चार मजुरांच्या मृत्यू प्रकरणी कामगार आयुक्त कार्यालयाकडून घटनेचा चौकशी अहवाल करून तो कामगार आयुक्तांना सादर करण्यात आला होता. त्यानंतर बांधकाम व्यावसायिकाला नोटीस बजावण्यात आली.

अपघातानंतर मजुरांना तत्काळ आर्थिक मदत बांधकाम व्यावसायिकांकडून मिळवून देण्याची जबाबदारी कामगार उपायुक्त कार्यालयावर असते. या घटनेनंतर काम बंद पडले आहे. त्याचबरोबर पोलीस कारवाईही झालेली आहे. यात चार संशयितांना कारवाईसाठी ताब्यात घेतलेले होते. कामगार उपायुक्त कार्यालयाची चौकशी आणि पोलिसांची कारवाईमुळे हे काम सध्या बंदच आहे. मात्र, तेथे असलेल्या मजुरांची या दरम्यान परवड झालेली आहे. कारण, या मजुरांना सध्या कामही नाही आणि त्यांना अजून भरपाईही मिळालेली नाही. परप्रांतीय असल्याने त्यांच्यावर बेरोजगारीची कुर्‍हाड कोसळलेली आहे. मात्र, त्यांचे आर्थिक नुकसान होऊ नये, म्हणून कामगार कल्याणकारी उपाययोजनांचा त्यांना लाभ मिळावा, यासाठी शासकीय यंत्रनेने हालचाली सुरू केल्या आहेत.

- Advertisement -

घटना घडून 10-12 दिवस झाले. तरीही प्रकल्प मालक अजून न्यायालयीन प्रक्रियेत असल्याने, त्यांनी अपिल करावे, यासाठी कामगार उपायुक्तांकडून नोटीस बजावण्यात आलेली आहे. त्यामुळे अपिल केले जात नाही, तोपर्यंत काम सुरू होत नाही. काम नाही म्हणून मजुरांना रोजगार नाही. यात त्यांची उपासमार होत आहे, हे अपघाताच्या घटनेनंतरचे विदारक चित्र, घटनास्थळी पाहायला मिळत आहे.

लेबर कोर्टात दावा दाखल

कामगार उपायुक्तांना अहवाल दिल्यानंतर आणि पोलिसांनी गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया झाल्यानंतर मजुरांना तत्काळ भरपाई आणि आर्थिक मदत घटनेच्या संबंधितांकडून मिळवून देण्यासाठी लेबर कोर्टात दावा दाखल करण्यात आला आहे. त्याचबरोबर इतर मजुरांचे कामबंदमुळे आर्थिक नुकसाने होऊन नये, म्हणून संबंधितांनी अपिलात जावे, यासाठीही अपना घरच्या व्यवस्थापनाला नोटीस देण्यात आलेली आहे.  – जी.जे. दाभाडे, कामगार उपायुक्त

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -