घरमहाराष्ट्रनाशिकरिपांइला गृहीत धरल्यास निवडणुकीत चित्र वेगळे : केंद्रियमंत्री आठवले

रिपांइला गृहीत धरल्यास निवडणुकीत चित्र वेगळे : केंद्रियमंत्री आठवले

Subscribe

आम्हाला गृहीत धरल्यास आगामी निवडणुकीत चित्र वेगळे असेल अशा शब्दांत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे प्रमुख केंद्रियमंत्री रामदास आठवले यांनी युतीला इशारा दिला.

ज्या काळात युती होण्याची चिन्हं जवळपास दिसत नव्हती, त्या काळापासून मी शिवसेना-भाजप युती व्हावी, असंच म्हणत होतो आणि प्रयत्न करत राहिलो. पण आता प्रत्यक्षात जेव्हा युती झाली तेव्हा मला आधी कळवलंदेखील नाही. कदाचित मी कधी कुरबुरी करत नसल्याने मला गृहीत धरलं गेलं असावं. परंतु आम्हाला गृहीत धरल्यास आगामी निवडणुकीत चित्र वेगळे असेल अशा शब्दांत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे प्रमुख केंद्रियमंत्री रामदास आठवले यांनी युतीला इशारा दिला. तसेच, आपण एनडीएसोबतच असल्याचे स्पष्ट करतांनाच माजी मंत्री छगन भुजबळांचेही आपल्याला आमंत्रण असल्याचा गौप्यस्फोटही त्यांनी यावेळी केला.

नाशिक येथे जिल्हाधिकारी कार्यालयात विविध योजनांच्या आढावा बैठकीनंतर आठवले यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी युतीत आपल्याला विश्वासात घेतले गेले नसल्याबाबत नाराजीही व्यक्त केली. लोकसभा निवडणुकीत आमच्या पक्षाला कमीत कमी एक तरी जागा द्या अशी मागणी रामदास आठवले यांनी केली आहे, युतीत आमचा विचार केला गेला नसला तरी, लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांची भेट घेणार असल्याचेही यावेळी त्यांनी स्पष्ट केले. आरपीआयला जागा न दिल्यास दलित नाराज होतील. त्याचा फटका हा लोकसभा निवडणुकीमध्ये बसेल असही ते म्हणाले. आठवले यांनी दक्षिण मुंबई, इशान्य मुंबई किंवा उत्तर पुर्व मुंबई यापैकी एक आणि राज्यात इतर ठिकाणी एक अशा दोन जागांची मागणी केली. परंतु युतीमध्ये आपला विचार न केला गेल्यास पुढची भुमिका काय असेल याबाबत विचारले असता ते म्हणाले, मी एनडीए सोबतच आहे. २०१९ मध्येही भाजपचेच सरकार सत्तेवर येईल आम्ही ज्यांच्याबरोबर जातो त्यांचा विजय हा निश्चित असतो असे सांगत मला माजी मंत्री छगन भुजबळांचाही फोन येउन गेल्याचे सांगत मी युती धर्म पाळत अद्याप भुजबळांची भेट घेतली नसल्याचे त्यांनी सांगत एक प्रकारे युतीला इशाराच दिला.

काय म्हणाले आठवले

  • भटक्या विमुक्तांना राजकारणातही आरक्षण द्यावे
  • काश्मीरमधील ३५ अ कलम रदद करावे
  • पाकिस्तानने पाकव्याप्त काश्मीरवरून आपला हक्क सोडावा
  • पाकिस्तानने भारताच्या हातात हात धरून आंतकवादाचा खात्मा करावा
  • भारतीय सैन्य दलात दलितांना आरक्षण द्यावे
  • सवर्णांना आरक्षण दिल्याने सामाजीक ऐक्य प्रस्तापित होणार
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -