घरमहाराष्ट्रनाशिकभाजप उमेदवाराचे काम करणार्‍यास मारहाण

भाजप उमेदवाराचे काम करणार्‍यास मारहाण

Subscribe

उमेदवार देवयानी फरांदे यांचे का करता, या कारणावरून २५ जणांच्या जमावाने एकाच्या कार्यालयात येत एकाला केली मारहाण

विधानसभा निवडणूक प्रचार शिगेला पोहचला आहे. उमेदवारांमध्ये चुरस व संघर्ष पाहायला मिळत आहे. उमेदवार निवडून येण्यासाठी कार्यकर्तेही वाटेल ते करण्यास तयार झाले आहेत. नाशिक मध्यच्या उमेदवार देवयानी फरांदे यांचे काम कशाला करता, या कारणावरून २५ जणांच्या जमावाने एकाच्या कार्यालयात येत एकाला मारहाण केली. त्याच्याकडील रोकड हिसकावत कुटुंबियांना धक्काबुकी व शिवीगाळ केली.

सोमवारी (दि.१४) दुपारी ३ वाजेदरम्यान वडाळा रोड येथे काझीनगर परिसरातील वानसिम व्हिला मेट्रो रुग्णालयाजवळ घडली. याप्रकरणी तन्वीर जब्बार खानवय यांनी मुंबईनाका पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार पोलिसांनी जमावाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. युनूस तांबोळी, फारुख तांबोळी, इम्रान तांबोळी, एजाज तांबोळी, रिजवान तांबोळी, दानिश तांबोळी, इकबाल तांबोळी, इरफान तांबोळी, लड्या तांबोळी अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. तन्वीर खानवय हे ऑफिसमध्ये काम करत होते. त्यावेळी त्यांच्याजवळ अनोळखी २५ व्यक्ती आले. तुम्ही देवयानी फरांदे यांचे काम कशाला करता, या कारणावरुन त्यांना मारहाण केली. खानवय यांनी टेबलवर ठेवलेली ४ लाख ९० हजार रुपयांची रोकड व दागिने बळजबरीने हिसकावले. त्यानंतर जमावाने खानवय यांच्या पत्नी, आई व मुलीस धक्काबुक्की करत शिवीगाळ केली. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक सोमनाथ गेंगजे करत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -