घरमहाराष्ट्रनाशिकरुग्णालयाची तोडफोड; कठोर कारवाईची मागणी

रुग्णालयाची तोडफोड; कठोर कारवाईची मागणी

Subscribe

आयएमए नाशिक शाखेचे अध्यक्ष डॉ. प्रशांत देवरे व सह्याद्री हॉस्पिटलचे सेंटर हेड संजय चावला यांची मागणी

सह्याद्री हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांसह कर्मचार्‍यांना केलेल्या मारहाणीचा निषेध करत संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी आयएमए नाशिक शाखेचे अध्यक्ष डॉ. प्रशांत देवरे व सह्याद्री हॉस्पिटलचे सेंटर हेड संजय चावला यांनी केली.

शालिमार येथील आयएमएच्या सभागृहात बुधवारी (दि. २) पत्रकार परिषद बोलावण्यात आली होती. या वेळी आयएमएचे सेक्रेटरी डॉ. विशाल गुंजाळ, खजिनदार डॉ. किरण शिंदे, सह्याद्रीचे संजय चावला, समीर फुटाणे, डॉ. प्रकाश पाटील, डॉ. अभिषेक पिंप्राळे, डॉ. अभिनंदन जाधव आदींनी या हल्ल्याचा निषेध केला. मंगळवारी, ३० एप्रिलला रस्ते अपघातातील जखमीला काही व्यक्ती सह्याद्री हॉस्पिटलमध्ये घेऊन आले होते. अतिदक्षता विभागातील सर्व बेड्सवर रुग्ण असल्याने, तेथे जखमीला दाखल करणे शक्य नव्हते. असे असतानाही डॉक्टरांनी सर्वतोपरी मदतीची तयारीही दर्शवली. मात्र, याच वेळी जखमीसोबत असलेल्या काहींनी डॉक्टरांसह पुरुष व महिला कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की केली. तसेच, हॉस्पिटलची तोडफोड केली होती. पोलिसांनी हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली. मात्र, अशा घटनांमुळे रुग्णालयात दाखल अन्य रुग्णांवर परिणाम होत असतो. डॉक्टर्स सदैव रुग्णसेवेत असतात. रुग्णांच्या नातेवाईकांनीही संयम बाळगून सहकार्य करावे, असे आवाहनही या वेळी करण्यात आले.

- Advertisement -

घटनेची पार्श्वभूमी अशी…

विशाल चौघुले याचा इगतपुरीजवळ अपघात झाला होता. वेळेवर उपचार मिळावेत, यासाठी जखमी अवस्थेतील विशालला मित्र व नातेवाईकांनी द्वारका भागातील सह्याद्री हॉस्पिटलमध्ये आणले. त्यावेळी सर्वजण त्याला अतिदक्षता विभागाकडे नेत असताना त्यांना बेड शिल्लक नसल्याचे सांगण्यात आले. त्याचा राग आल्याने विशालच्या मित्र व नातेवाईकांनी रिसेप्शन विभागातील हर्षल भदाणे याला मारहाण करत तोडफोडीस सुरुवात केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -