घरमहाराष्ट्रनाशिकओला कारचालकावर जीवघेणा हल्ला

ओला कारचालकावर जीवघेणा हल्ला

Subscribe

प्रवाशाने कल्याण येथून नाशिक मध्ये आल्यावर चाकूने केले वार

ओला कार ऑनलाईन बुक करत एक प्रवासी कल्याण येथून नाशिकमध्ये आला. प्रवाशाने चालकास गाडी हळू चालविण्यास सांगत त्याच्यावर जीवघेणा हल्ला केला. याप्रकरणी कारचालक भैरवनाथ सोमनाथ झेंडगे यांनी मुंबईनाका पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून पोलिसांनी त्या प्रवाशावर गुन्हा दाखल केला आहे. सोनू कुमार सुभाषकुमार साहू (रा.कल्याण, जि.ठाणे) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनू साहू याला शिळगाव फाटा, कल्याण येथून नाशिकला येण्यासाठी ओला कार ऑनलाइन बुक केली. ओला कारचालक भैरवनाथ झेंडगे यांनी साहू याला कल्याण येथून नाशिकला आणले. काठीयावाड शोरूमच्या दुकानासमोर कार आली असता साहू याने गाडी हळू चालविण्यास सांगितले. त्यानुसार कारचालकाने गाडी हळू चालविण्यास सुरुवात केली. त्यावेळी साहू याने कारचालक भैरवनाथ झेंडगे यांच्या मानेवर व हातावर चाकूने वार करत जीवेठार मारण्याचा प्रयत्न केला. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण शिंदे करीत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -