घरमहाराष्ट्रनाशिकदिंडीत निर्भया पथकाकडून जनजागृती

दिंडीत निर्भया पथकाकडून जनजागृती

Subscribe

पोलीस आयुक्तालयातर्फे प्रबोधन

पोलीस आयुक्तालयातर्फे शहरात १० निर्भया पथके मुली व महिलांच्या सुरक्षततेसाठी तैनात आहेत. निर्भया पथकाकडून महाविद्यालयीन मुली व महिलांमध्ये जनजागृती केली जात आहे. निर्भया पथक क्रमांक तीनने सिडकोतील जनता विद्यालयातर्फे आयोजित करण्यात आलेल्या दिंडीत सहभाग घेत जनजागृती केली.

शहरात निर्भया पथकातील महिला पोलीस साध्या वेशात सार्वजनिक ठिकाणी टवाळखोरांवर करडी नजर ठेवत कारवाई करत आहेत. निर्भया पथकामुळे मुली व महिलांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण होऊ लागली असून टवाळखोरांवर वचक निर्माण झाला आहे. जनता विद्यालयातर्फे आयोजित करण्यात आलेल्या दिंडीत निर्भया पथकाने मुली व महिलांशी संवाद साधत माहितीपत्रके वाटप केली. दिंडीत निर्भया पथक तीनच्या पोलीस उपनिरीक्षक छाया देवरे, तेलुरे, कावेरी गांगुर्डे आदी सहभागी झाल्या होत्या.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -