घरताज्या घडामोडीशरीरसुख न दिल्याने मेहुणीस मारहाण

शरीरसुख न दिल्याने मेहुणीस मारहाण

Subscribe

शरीरसुखास नकार दिल्याने दाजीने मेहुणीला शिवीगाळ, मारहाण व जातीवाचक बोलल्याची घटना अण्णाभाऊ साठेनगर, वडाळागाव येथे घडली. याप्रकरणी पीडितेच्या बहिणीने इंदिरानगर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
फिरोज मुसा शेख (सर्वजण रा.वडाळागाव), युसुफ मुसा शेख, जावेद मुसा शेख, गुड्डी जावेद शेख, मुसा शेख, हिना युसुफ शेख अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

पोलिसांच्या माहितीनुसार, फिर्यादीच्या बहिणीचा फिरोज मुसा शेख याच्याशी प्रेमविवाह झाला आहे. लग्नानंतर त्याने दारुच्या नशेत पत्नीशी वारंवार भांडण केले. याप्रकरणी मेहुणीने मध्यस्थी होत त्याला समजून सांगण्याचा प्रयत्न केला. राग अनावर झाल्याने त्याने मेहुणीला शिवीगाळ करत ठार मारण्याची धमकी दिली. मेहुणी घरात एकटी असताना दारुच्या नशेत तो घरात घुसला. त्याने मेहुणीकडे शरीरसुखाची मागणी केली. त्यास तिने नकार दिला असता त्याने तिचा विनयभंग करत मारहाण केली. तिला जातीवाचक बोलून घरातून निघून गेला. त्यानंतर शेख कुटुंबातील सहाजण तिच्या घरात बळजबरीने घुसले. सर्वांनी तिला शिवीगाळ व दमदाटी केली. पुढील तपास इंदिरानगर पोलीस करत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -