घरमहाराष्ट्रनाशिकभुजबळ राष्ट्रवादीचेच

भुजबळ राष्ट्रवादीचेच

Subscribe

येवल्यातूनच निवडणूक लढवण्याचा पुनरूच्चार

आगामी विधानसभा निवडणूक लढवण्याबाबत राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी मोठी घोषणा केली आहे. आपण कोणत्याही पक्षात जाणार नसून राष्ट्रवादीतच राहणार असल्याचे स्पष्टीकरण देत येवला मतदारसंघातूनच निवडणूक लढवणार असल्याचेंही भुजबळ यांनी जाहीर केले आहे. त्यामुळे तुर्तास तरी भुजबळांच्या सेना प्रवेशाला पुर्णविराम मिळाला आहे.

हे देखील वाचा – महाराष्ट्रात परिवर्तन दिसेल; नवाब मलिक यांचा विश्वास

- Advertisement -

गेल्या काही दिवसांपासून छगन भुजबळ हे शिवसेनेत जाणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु होती. भुजबळ येवल्यातून शिवसेनेच्या तिकिटावर निवडणूक लढविणार असल्याची जोरदार चर्चा सुरू होती. याबाबत भुजबळ किंवा शिवसेनेकडूनही कोणत्याही प्रकारचा खुलासा केला जात नसल्याने या चर्चेला अधिकच पुष्टी मिळत होती. दरम्यान खासदार सुप्रिया सुळे यांच्या नाशिकमधील संवाद दौरा तसेच अलीकडेच नाशिक दौरयावर आलेले राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या दौरयात भुजबळांची गैरहजेरी चर्चेचा विषय ठरली. मात्र आज निवडणूक आचारसंहीता जाहीर झाल्यानंतर भुजबळ यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहे आणि राष्ट्रवादी पक्षाकडूनच येवला मतदारसंघातून निवडणूक लढविणार असल्याचे छगन भुजबळ यांनी जाहीर केले आहे. स्वपक्षातूनच भुजबळ यांना आव्हान देण्यात आले आहे याबाबत विचारले असता ते म्हणाले की, प्रत्येक पक्षात एकापेक्षा अधिक इच्छुक असतातच मात्र याबाबतचा निर्णय पक्षश्रेष्ठी घेत असतात आमच्या पक्षातही इच्छुक आहेत मात्र उमेदवारी कोणाला द्यायची याचा निर्णय पक्ष घेईल मीदेखील येवल्यातून निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केल्याचे त्यांनी सांगितले.

- Advertisement -

निवडणूक प्रक्रियेविषयी शंका

राज्यात २१ ऑक्टोबरला मतदान होत असून २४ ऑक्टोबरला मतमोजणी होत आहे. त्यावर भुजबळ यांनी आक्षेप घेतला आहे. ईव्हीएमबाबत सुरुवातीपासूनच लोकांचा आक्षेप आहे. असे असतांना मतमोजणी आणि मतदानामध्ये तीन दिवसाचे अंतर का ठेवण्यात आले? दुसर्‍या दिवशी मतमोजणी का ठेवली नाही. आम्ही सत्तेत असतानाही निवडणुका व्हायच्या. तेव्हा दुसर्‍या दिवशी किंवा फारफार तर त्यानंतर मतमोजणी व्हायची. यावेळी मात्र मतमोजणीत तीन दिवसाचं अंतर ठेवण्यात आले आहे, असे सांगतानाच सरकारला ईव्हीएममध्ये गडबड करायची तर नाही ना? अशी शंका कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झाल्याचे सांगत भुजबळांनी निवडणूक प्रक्रियेविषयी शंका उपस्थित केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -