घरताज्या घडामोडीभुजबळ म्हणतात, कोरोनाकाळात मी ऑर्थर जेलमध्ये असतो तर?

भुजबळ म्हणतात, कोरोनाकाळात मी ऑर्थर जेलमध्ये असतो तर?

Subscribe

पोलीस कोरोना सेंटरच्या उदघाटन

नाशिकचे सध्याचे पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय हे ज्या ऑर्थर जेलमध्ये अधिकारी होते तेथे मीही अडीच वर्ष मुक्कामी होतो. जेलमधून बाहेर आलो आणि कोरोनाचं प्रकरण सुरु झालं. म्हटलं जर आपण आता जेलमध्ये असतो तर काय झालं असतं.. पालकमंत्री छगन भुजबळ यांनी प्रथमच ऑर्थर जेलसंदर्भातील आठवण जाहीरपणे बोलून दाखवली. पोलीस कोवीड सेंटरच्या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते.

भुजबळ पुढे म्हणाले की, ऑर्थर जेलमध्ये मी चांगला अडीच वर्ष होतो. नंतर जेंव्हा बाहेर आलो तेंव्हा कोरोना सुरु झालं आणि मी म्हटलं आता जर आपण आतमध्ये असतो तर काय झालं असतं. कारण मला कल्पना आहे. जेलमध्ये १० पट कैदी आहेत. पण आता शंका मनातून दूर झाली आहे. पाण्डेय साहेबांनी चांगली व्यवस्था केली होती.

- Advertisement -

आम्ही तिघे जुने योद्धे 

बरेचसे अधिकारी आदलाबदली होवून नवीन योद्धे नाशिकमध्ये आले आहेत. विशेष पोलीस महानिरीक्षक प्रताप दिघावकर, पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय, नाशिक ग्रामीणल सचिन पाटील, महापालिका आयुक्त म्हणून कैलास जाधव आले आहेत. जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून लीना बनसोड आल्या. उर्वरित आम्ही तिघे (विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी सूरज मांढरे) जुने योद्धे आहोत, असेही भुजबळ म्हणाले.

कोरोना संसर्ग कसा वाढतोय तेच समजेना : गमे

विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे म्हणाले की, चार दिवसांपुर्वी जळगावला जात होतो. चाळीसगावला थांबलो असता एक मिनिटच प्रांताधिकारी भेटले. जळगाववरुन परत आल्यावर समजले प्रांताधिकारी पॉझिटिव्ह आल्याचे समजले. त्यांना आता ताप आला आहे. दुसर्‍या दिवशी दोन गार्ड पॉझिटिव्ह आले. चौथ्या दिवशी आज विभागीय आयुक्तालयातील चार एचओडी पॉझिटिव्ह आले आहेत. संसर्ग कसा वाढतोय हेच समजेनासं झाले आहे. कॉन्टॅक्ट ट्रेसिंग किती करायचे अजून? त्यामुळे स्वत:ची काळजी स्वतळ् घेणे गरजेचं आहे, असेही गमे यांनी सांगितले.

- Advertisement -

 

नाशिक परिक्षेत्राचा बाहेरुन पाठिंबा : दिघावकर

कोविड सेंटरमध्ये शहर व जिल्ह्यातील पोलिसांवर उपाचर केले जाणार असे सांगितले असता त्यावर डॉ. प्रताप दिघावकर म्हणाले, पांडे सर आपण फक्त नाशिक ग्रामीणचा उल्लेख केला. पण मी सविनय कायदेभंग करुन नाशिक परिक्षेत्र यामध्ये घेणार आहे. पूर्ण नाशिक परिक्षेत्रासाठी सेंटरचा वापर करणार आहे. त्यामुळे आपणही थोडं मोठ मन करा. पाण्डेय यांनी कोविड सेंटरबाबत चर्चा केली असता त्यांना नाशिक परिक्षेत्राचा बाहेरुन पाठिंबा राहील असे सांगितले. आता सगळ्यात ही चांगली गोष्ट आहे की, फायदा घ्यायचा आणि बाहेरुन पाठिंबा द्यायचा. त्यांनी खूप मोठं मन केली आणि संयुक्त विद्यमाने कोविड सेंटरचे उदघाटन होत आहे.

 

हम होंगे कामयाब, हम कामयाब होकर रहेंगे

कोरोना भिती घालवा : छगन भुजबळ

राज्याच्या तुलनेत नाशिकमध्ये मृत्यूमुखी दर सर्वांत कमी आहे. आगामी काळात नक्की जिंकू या. हम होंगे कामयाब, हम कामयाब होकर रहेंगे. आता लोकांना मास्क, सॅनिटायझर व सोशल डिस्टन्सिंगचे महत्वं कळू लागले आहे. कोरोनाबाबतची भिती पहिल्यांदा घालविली पाहिजे. सर्वांनी जबाबदारीने वागले पाहिजे. सर्वांनी काळजी, योग्य औषधोपचार आणि योग्य आहार घेतल्यास कोरोनापासून निश्चित बचाव करता होवू शकतो. असे मत पालकमंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केले.

पोलीस आयुक्तालय परिसरातील पोलीस कोविड केअर सेंटरचे उदघाटन शुक्रवारी (दि.१८) पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी विशेष पोलीस महानिरीक्षक प्रताप दिघावकर, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय, महापालिका आयुक्त कैलास जाधव, जिल्हा परिषद अध्यक्ष लीना बनसोड आदी उपस्थित होते.

दिघावकर म्हणाले, रुग्णालय, कोविड सेंटर एक मानसिक आधार आहे. महाराष्ट्र पोलीस दहशतवादी, अतेरिकी, लक्षलवाद्यांशी लढले आहेत. मात्र, कोरोनामुळे १२७ जवान आणि १७ अधिकारी मृत्यूमुखी पडले आहेत.

पोलीस आयुक्त पाण्डेय म्हणाले, मुंबईत कोरोनाचा विस्फोट झाला होता. तेंव्हा ऑर्थर तुरुंगातील अनेक अधिकारी व कैदी कोरोनाबाधित आढळून आले. बाधितांना सुरुवातीला रोग प्रतिकारशक्ती वाढीसाठी औषधे देण्यात आली. त्यामुळे १२० जण कोरोनामुक्त झाले. उर्वरित ६० बाधितांवर कोरोनामुक्त करणे आव्हान होते. नॅचरोपॅथी उपचार सुरु केले असता १५ दिवसांत सर्वजण कोरोनामुक्त झाले. त्यामुळे कर्मचार्‍यांना देव मानू लागले. मालेगाव, ऑर्थर तुरुंग आणि धारावी हे यशस्वी पॅटर्न झाले आहेत. नाशिकमध्ये अनुभवाचा उपयोग करणार आहे. पोलीस आयुक्तालयातील कोविड सेंटरमध्ये ऑक्सिजनची व्यवस्था करण्यात आली आहे. या ठिकाणी कोरोनाबाधित व संशयित रुग्णांवर उपचार केले जाणार आहेत. दोन रुग्णवाहिका सज्ज असून आणखी चार रुग्णवाहिका उपलब्ध होणार आहेत. रुग्णांसाठी जेवण नॅचरोपॅथीनुसार जेवण दिले जाणार आहे. रुग्णांना नातेवाईकांशी अंतर ठेवून संवाद साधता येणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -