घरमहाराष्ट्रनाशिकडॉ. भामरे, पाटील यांच्यातील चुरस तीव्र

डॉ. भामरे, पाटील यांच्यातील चुरस तीव्र

Subscribe

संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांच्या विरोधात काँग्रेसचे उमेदवार आमदार कुणाल रोहिदास पाटील यांनी कडवे आव्हान उभे केल्याने भाजपा उमेदवार डॉ. सुभाष भामरे यांच्या अस्तित्वाच्या लढाईसाठी त्यांच्या कार्यकर्त्यांनी अंतिम टप्प्यात कंबर कसली आहे.

धुळे जिल्ह्यातील तीन व नाशिक जिल्ह्यातील तीन मतदारसंघ मिळून असलेल्या धुळे लोकसभा मतदार संघात २९ एप्रिलला निवडणूक होत आहे. अंतिम टप्प्यातील प्रचार आरोप-प्रत्यारोपांच्या फैरीत चांगलाच शिगेला पोहोचला आहे. संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांच्या विरोधात काँग्रेसचे उमेदवार आमदार कुणाल रोहिदास पाटील यांनी कडवे आव्हान उभे केल्याने भाजपा उमेदवार डॉ. सुभाष भामरे यांच्या अस्तित्वाच्या लढाईसाठी त्यांच्या कार्यकर्त्यांनी अंतिम टप्प्यात कंबर कसली आहे.

धुळे लोकसभा मतदारसंघात निर्णायक मतदानाची भूमिका घेणारा बागलाण विधानसभा कार्यक्षेत्रात सध्या दोघा उमेदवारांच्या भवितव्यासाठी दोघा ही उमेदवारांच्या कार्यकर्त्यांकडून जोरदार प्रचार केला जात आहे. शहकाटशाहच्या राजकारणात बागलाणचा मतदार कोणाच्या बाजूने कौल देतो हे आगामी काळात दिसणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने आगामी विधानसभेची रणनीती आखली जाणार असल्याने बागलाणच्या आमदार दीपिका चव्हाण, माजी आमदार संजय चव्हाण यांनी, तर चव्हाण यांचे कायमचेच प्रतिस्पर्धी असलेले माजी आमदार दिलीप बोरसे यांनीही ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. माजी आमदार संजय चव्हाण यांनी कुणाल पाटील यांच्या पारड्यात सर्वाधिक मतदान टाकण्यासाठी आपल्या सर्वच कार्यकर्त्यांना जोरदार कामाला लावले आहे. माजी आमदार दिलीप बोरसे यांनीही मोसमसह पश्चिम आदिवासी भागात आपल्या आदिवासी कार्यकर्त्यांना मतभेद विसरत एकत्र आणत भाजपा उमेदवार डॉ सुभाष भामरे यांच्या पाठीशी ताकद उभी करण्याचे आवाहन केले आहे. पश्चिम आदिवासी भागातील आदिवासी आघाडीचे पुढारी काँग्रेस उमेदवारांबरोबर गेल्याने पश्चिम आदिवासी भागात काँग्रेस उमेदवाराने प्रचार यंत्रणेत जोरदार मुसंडी मारल्याचे सद्यस्थितीत दिसून येत आहे. भाजपाकडूनही या भागात जोरदार प्रचार केला जात आहे.

- Advertisement -

दोन लाखांच्या वर मतदारसंख्या असलेल्या बागलाणमध्ये दोघा उमेदवारांकडून सिंचनाच्या प्रश्नावरच प्रचार केला जात असल्याने या निवडणुकीचा मुख्य अजेंडा हा पाणी प्रश्न ठरला आहे. जनतेच्या इतरही भरपूर समस्या असताना या मतदारसंघात पाणीप्रश्नाला वाचा फोडत आगामी काळात सिंचनाच्या प्रकल्पांवर भर दिला जाणार असल्याचे आश्वासने दिली जात आहेत. भाजप उमेदवार डॉ. सुभाष भामरे यांचा या भागात गत पाच वर्षात असलेला जनसंपर्क ही त्यांची जमेची बाजू असली तरी बागलाणमध्ये व्यक्तीद्वेषाच्या राजकारणामुळे त्यांची पक्षांतर्गतच राजकीय गळचेपी करण्याचा सुरुवातीपासूनच झालेला प्रयत्न त्यांना बागलाणमध्ये प्रत्यक्षात किती मताधिक्य मिळवून देतो हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. डॉ. सुभाष भामरे यांच्या नावाने तालुक्यात यामागे झालेल्या घडामोडींमुळे तालुक्यातील कार्यकर्त्यांकडून उमेदवारीच्या सुरुवातीलाच नाराजी व्यक्त झाल्याने व मित्रपक्ष शिवसेनेने सुरुवातीलाच उघड नाराजी व्यक्त करीत नंतर स्वतंत्र शिवसेनेचा मेळावा घेत सेनेची तालुक्यातील ताकद दाखवण्याचा प्रयत्न केला.

मेळाव्यात डॉ. भामरे यांना निवडून आणण्याचा शब्द दिला. यामुळे निवडणूक अंतिम टप्यात रंगतदार होत आहे. उमेदवार खान्देशातील असले तरी त्यांची जय-पराजयाची गणिते बागलाणच्या मतदारांवर अवलंबून असल्याने या निवडणुकीत बागलाणचा मतदार ‘किंगमेकर’ ठरणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -