घरमहाराष्ट्रनाशिकअनिल गोटे यांची अखेर भाजपमधून हकालपट्टी

अनिल गोटे यांची अखेर भाजपमधून हकालपट्टी

Subscribe

धुळयात भाजपमध्ये चार वर्षांपासून गटा-तटाचे राजकारण उघड सुरू

धुळे येथील आमदार अनिल गोटे यांची अखेर भाजपमधून हकालपट्टी झाली आहे. तर, राष्ट्रवादीचे नगरसेवक तथा बहुजन वंचित आघाडीचे उमेदवार नबी अहमद यांचीदेखील पक्षाने हकालपट्टी केली आहे. दरम्यान, यापुर्वीच आमदारपद व पक्षाच्या सदस्यपदाचा राजीनामा दिला असताना आता लोकसभा निवडणुकीवर परिणाम करण्यासाठी ही कारवाई असल्याची प्रतिक्रीया आमदार गोटे यांनी दिली आहे.

धुळयात भाजपमध्ये चार वर्षांपासून गटा-तटाचे राजकारण उघड सुरू आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत आमदार अनिल गोटे यांनी डॉ. सुभाष भामरे यांच्या उमेदवारीवर आक्षेप घेत प्रचारापासून लांब राहण्याचे जाहीर केले होते. त्यावेळी दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांनी गोटे यांची समजूत घातल्याने त्यांनी प्रचार केला. यानंतर विधानसभा निवडणुकीत गोटे हे धुळे मतदारसंघातून भाजपच्या उमेदवारीवर विजयी देखील झाले. पण त्यावेळीपासूनच राज्याचे मंत्री जयकुमार रावल व केंद्रीय मंत्री डॉ. सुभाष भामरे यांच्याबरोबर गोटे यांचे मतभेद सुरू झाले. मनपा निवडणुकीत हे वाद विकोपाला पोहोचले. आता भाजपाबरोबर बंड करीत गोटे यांनी लोकसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवारी केली. तत्पुर्वी त्यांनी विधानसभेचे अध्यक्ष यांच्याकडे आमदारपदाचा राजीनामा सोपवला. आता भाजपनेदेखील गोटे यांच्यावर पलटवार करत त्यांची पक्षातून हकालपटटी केली आहे. दरम्यान, धुळे लोकसभा मतदारसंघात मालेगावचे नगरसेवक नबी अहमद यांनी बंचित बहुजन आघाडीच्यावतीने उमेदवारी केली आहे. या मतदारसंघात कॉग्रेस राष्ट्रवादीचा उमेदवार असताना नबी अहमद यांनी बंडखोरी केली असल्याने त्यांनादेखील पक्षातून हकालेले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -