घरमहाराष्ट्रनाशिक भाजप नेते खडसे अखेर राष्ट्रवादीच्या वाटेवर, प्रवेशासाठी घटस्थापनेचा मुहूर्त

 भाजप नेते खडसे अखेर राष्ट्रवादीच्या वाटेवर, प्रवेशासाठी घटस्थापनेचा मुहूर्त

Subscribe

गेल्या काही दिवसांपासनं नाथाभाऊंच्या पक्षांतराची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

घटस्थापनेच्या पहिल्या दिवशी भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतील, असा दावा खडसेंचे कट्टर समर्थक तथा माजी आमदार उदेसिंग पाडवी यांनी केलाय. मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांसोबत चर्चा झाल्यानंतर पक्ष प्रवेशाचा निर्णय घेतल्याचं खडसेंनी तसा निर्णय घेतल्याची माहिती पाडवी यांनी दिली. नंदुरबारमध्ये एका कार्यक्रमात ते बोलत होते. दरम्यान, पाडवी यांच्या या दाव्यावर एकनाथ खडसे यांची प्रतिक्रिया समोर आलेली नाही. आपण खडसेंच्याच आदेशानं राष्ट्रवादीत प्रवेश केल्याचंही पाडवींनी सांगितलं. पक्षप्रवेशाने खडसेंना राष्ट्रवादीत मानसन्मान आणि राज्याच्या मंत्रिमंडळात स्थान मिळेल, असा दावाही पाडवींनी केलाय. गेल्या काही दिवसांपासनं नाथाभाऊंच्या पक्षांतराची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. भाजपांतर्गत धुसफूस आणि टिकेमुळे खडसे सातत्याने चर्चेत आहेत. त्यामुळे पाडवींच्या दाव्यानंतर आता सर्वांचंच लक्ष्य घटस्थापनेच्या मुहूर्ताकडे लागलंय.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -