घरमहाराष्ट्रनाशिकभाजप आमदारांचा विनाहेल्मेट विजय 'संकल्प’

भाजप आमदारांचा विनाहेल्मेट विजय ‘संकल्प’

Subscribe

केंद्रीय मंत्री नीतीन गडकरी यांच्यासह भारतीय जनता पार्टीच्या अन्य मंत्र्यांकडून हेल्मेट वापरण्याविषयी जनजागृती सुरु असताना भारतीय जनता पक्षाच्या वतीने रविवारी ३ मार्चला शहरातून काढण्यात आलेल्या विजय संकल्प दुचाकी रॅलीत आमदार, नेते आणि कार्यकर्त्यांनी विनाहेल्मेट प्रवास केला. त्यामुळे नियम केवळ सर्वसामान्य वाहनचालकांसाठीच आहे का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

केंद्रीय मंत्री नीतीन गडकरी यांच्यासह भारतीय जनता पार्टीच्या अन्य मंत्र्यांकडून हेल्मेट वापरण्याविषयी जनजागृती सुरु असताना भारतीय जनता पक्षाच्या वतीने रविवारी ३ मार्चला शहरातून काढण्यात आलेल्या विजय संकल्प दुचाकी रॅलीत आमदार, नेते आणि कार्यकर्त्यांनी विनाहेल्मेट प्रवास केला. त्यामुळे नियम केवळ सर्वसामान्य वाहनचालकांसाठीच आहे का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

भारतीय जनता पक्षाच्या वतीने लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वातावरण निर्मिती करण्यासाठी देशभरात विजय संकल्प रॅली काढण्यात येत आहे. नाशिक पूर्व, मध्य आणि पश्चिम विधानसभा मतदारसंघात दुचाकी रॅलींचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीत आमदार बाळासाहेब सानप, आमदार प्रा. देवयानी फरांदे यांच्यासह अनेक स्थानिक पदाधिकार्‍यांनी सहभाग घेतला. मात्र, सुरक्षीततेच्या दृष्टीने आवश्यक असलेले हेल्मेट परिधान करण्यास मात्र टाळण्यात आले. विशेष म्हणजे वाहतूक पोलिसांनी संबंधितांवर कोणतीही कारवाई न करता रॅलीसाठी वाट मोकळी केली. त्यामुळे सर्वसामान्य वाहनचालकांमध्ये मोठा संताप व्यक्त केला जात आहे.

- Advertisement -

महिलांचा लक्षणीय सहभाग

पूर्व मतदार संघाच्या रॅलीमध्ये आमदार बाळासाहेब सानप, भाजपाचे मंडल अध्यक्ष चंद्रशेखर पंचाक्षरी, बाजीराव भागवत, गटनेते संभाजी मोरुस्कर, उत्तम उगले, सुनील आडके, अमित घुगे, सचिन हांडगे, शरद मोरे, अंबादास पगारे यांसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले होते. पंचवटी कारंजा येथून या रॅलीला सुरुवात करण्यात आली होती. पंचवटी कारंजा, मालेगाव स्टँड, आडगाव नाकामार्गे नांदूर नाका, झेड बिटको पॉइंट शिखरे वाडी या मार्गाने आडगाव नाका येथील सावरकर स्मारक येथे या रॅलीचा समारोप करण्यात आला. या रॅलीमध्ये मोठ्या संख्येने भाजपाचे पदाधिकारी कार्यकर्ते सहभागी झाले होते. महिला आघाडी युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांची संख्या लक्षणीय होती. भारत माता की जय, वंदे मातरम, भारतीय जनता पार्टीचा विजय असो, अशा घोषणा देत कार्यकर्त्यांनी परिसर दणाणून सोडला होता. रॅलीमध्ये संदीप जोशी, नरेश उगले, ऋषिकेश आहेर, गणेश सानप, धनंजय माने, प्रशांत हिरे, महेंद्र कराड, दीपक सानप, अनिल वाघ, प्रवीण आहेर, मोहिनी भगरे, सुमित्रा लाटे, स्मिता मुठे, गायत्री पाठक, नितेश फरताळे, प्रभाकर येवले आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -