नाशकात एकाच दिवशी दोघांच्या आत्महत्या

आत्महत्या

नाशिक शहरात दिवसेंदिवस एकटेपणा, प्रेमभंग, वाढत्या अपेक्षा, छळ व नैराश्यातून आबालवृद्धांमध्ये गळफास व विषारी औषध प्राशन करून आत्महत्या करण्याच्या घटनांत वाढ होत आहे. वाढत्या आत्महत्येच्या घटनांमुळे कुटुंबिय व नातेवाईकांमध्ये चितेंचे वातावरण आहे. शहरात रविवारी (दि.८) एकाच दिवशी दोनजणांनी जीवनयात्रा संपवली. याप्रकरणी म्हसरुळ व इंदिरानगर पोलीस ठाण्यांत तक्रारी दाखल झाल्या आहेत. अश्वमेध नगर येथील जीवन नारायण शिंगाडे (३६), आनंदनगर येथील रोहिणी दीपक मिस्तरी (३८) यांनी आत्महत्या केल्या आहेत.

पहिल्या घटनेत, जीवन शिंगाडे यांनी राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केली. ही बाब कुटुंबियांना समजताच त्यांना उपचारार्थ जिल्हा रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकार्‍यांनी तपासणी करत त्यांना मृत घोषित केले. पुढील तपास पोलीस हवालदार पठाण करत आहेत.

दुसर्‍या घटनेत, रोहिणी मिस्तरी यांनी राहत्या घरातील बेडरुमला आतून कडी लावून घेत आत्महत्या केली. ही बाब कुटुंबियांना समजताचा उपचारार्थ त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकार्‍यांनी तपासणी करत त्यांना मृत घोषित केले. पुढील तपास पोलीस हवालदार शेख करत आहेत.