घरमहाराष्ट्रनाशिकमैत्रीच्या नात्यांचे आज सेलिब्रेशन

मैत्रीच्या नात्यांचे आज सेलिब्रेशन

Subscribe

‘फ्रेंडशीप डे’निमित्ताने शहरभरातील तरुणाईत उत्साह; आकर्षक बँड्स, ग्रिटिंग्स आणि गिफ्ट्सला पसंती

ऑगस्टच्या पहिल्या रविवारी येणारा आणि तरुणाईत प्रचंड उत्सुकता असलेला ‘फ्रेंडशीप डे’ आज (दि. 4) सर्वत्र साजरा होत आहे. या पार्श्वभूमीवर मैत्रीचे बंध घट्ट करण्याच्या उद्देशाने तरुणाईकडून पूर्वसंध्येलाच वेगवेगळे बँड्स, गिफ्ट्स, ग्रिटिंग्स खरेदीसाठी प्रचंड उत्साह दिसून येत होता. शहरातील गिफ्ट्स गॅलरींसह हॉटेल्स, कॉफी कॅफेही सज्ज झाले आहेत. यंदा कपल्स रिंग आणि विविधरंगी फ्रेण्डशिप बँडचे आकर्षण असल्याचे विक्रेत्यांकडून सांगण्यात आलेे. एकीकडे खरेदी, सेलिब्रेशनचा उत्साह असताना काही तरुणांनी सामाजिक बांधिलकी जोपासण्याचा निर्धार करत उपेक्षित, गरीब-गरजूंसमवेत हा दिवस साजरा करण्याचा निर्धारही बोलून दाखवला आहे.

फ्रेंडशीप डे हा नेहमीच अविस्मरणीय ठरावा यासाठी तरुणाईची धडपड असतेच. आपल्या मैत्रीपूर्ण संबंधांना ‘स्पेशल’ ठरविण्यासाठी तसेच हे क्षण हटक्या पद्धतीने साजरे करण्यासाठी अनेकसा तरुणाईकडून शहराबाहेरील निसर्गरम्य वातावरणात ‘सेलिब्रेशन’ला पसंती दिली जाते. याच निमित्ताने फ्रेंडशीप डेच्या पूर्वसंध्येलाच शहरातील तसेच शहराबाहेरील हॉटेल्स, कॅफे सज्ज झाले असून, काहींनी वेगवेगळ्या थीमवर सेलिब्रेशनची मेजवानी निश्चितही केली आहे. गिफ्ट्स आणि ग्रिटिंग्सची क्रेझ सोशल मीडियाच्या युगातही कायम असून, बाजारपेठेत शनिवारी दिवसभर खरेदीसाठी तरुणांची विशेषत: महाविद्यालयीन युवतींची मोठी गर्दी दिसून येत होती.

- Advertisement -

फ्रेंडशीप डे’चा इतिहास…

फ्रेंडशीप डे हा दिवस दक्षिण अमेरिकेत व पॅराग्वेमध्ये अनेक वर्षांपासून साजरा केला जातो. १९५८ साली पहिल्या आंतरराष्ट्रीय ‘फ्रेंडशीप डे’चा प्रस्ताव ठेवण्यात आला. त्यानंतर सर्व देशांनी हा दिवस साजरा करण्यास सुरुवात केली. २७ एप्रिल २०११ रोजी संयुक्त राष्ट्र संघाच्या आमसभेत ३० जुलैला आंतरराष्ट्रीय फ्रेंडशीप डे साजरा करण्याचा प्रस्ताव संमत करण्यात आला. मात्र, भारतासह अनेक दक्षिण आशियाई देशांमध्ये ऑगस्टच्या पहिल्या रविवारी फ्रेंडशीप डे साजरा केला जात आहे.

कपल्स रिंगचे आकर्षण

तरुणांमध्ये यंदा कपल्स रिंगचे अधिक आकर्षण असल्याचे दिसून येत आहे. याचबरोबर आकर्षक विविधरंगी बँड्स आणि टेडीज त्याचबरोबर छोटे आकर्षक गिफ्ट्सही तरुणांच्या पसंतीस उतरत होते. अगदी 5 रुपयांपासून ते हजार रुपयांपर्यंत विक्रीस उपलब्ध आहेत. हॉटेल्समध्येही अनेक आकर्षक थीमनुसार सजावट करण्यात आली असून, तरुणाईला आकर्षित करण्यासाठी खास ‘मेनू’ आणि ऑफर्सही ठेवण्यात आल्या आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -