मोहाडीत राष्ट्रीय काँग्रेस शाखा फलकाची मोडतोड

अज्ञात समाजकंटकांचे कृत्य; पोलिसांनी कारवाई करण्याची मागणी

Nashik
congress falak
मोहाडीत राष्ट्रवादी काँग्रेस शाखा फलकाची मोडतोड

राष्ट्रीय कॉँग्रेस पक्षाच्या मोहाडी (ता. दिंडोरी) येथील शाखा फलकाची अज्ञात समाजकंटकांनी मोडतोड केल्याने काँग्रेस कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला आहे.

मोहाडी येथील कर्मवीर एकनाथभाऊ जाधव प्रवेशद्वाराशेजारी गेल्या तीस वर्षांपूर्वी काँग्रेसचे तत्कालीन जिल्हाध्यक्ष राजाराम पानगव्हाणे यांच्या हस्ते या फलकाचे अनावरण करण्यात आले होते. गेल्या दोन वर्षांपूर्वीदेखील हा फलक एका व्यक्तीने कापला होता. पोलीस कारवाईला घाबरून संबंधिताने कसाबसा तो दुरुस्त करून दिला होता. मात्र, आता पुन्हा ऐन आपत्ती व्यवस्थापन काळात काही माथेफिरू समाजकंटकांनी या फलकाची मोडतोड केल्याने काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. या समाजकंटकांचा शोध घेऊन संबंधितांवर तातडीने कडक कारवाई होण्याची मागणी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केली आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here