घरमहाराष्ट्रनाशिकमुक्त विद्यापीठात बीएससी अ‍ॅग्रीक्लचर, एमए हिंदी व मराठी अभ्यासक्रम

मुक्त विद्यापीठात बीएससी अ‍ॅग्रीक्लचर, एमए हिंदी व मराठी अभ्यासक्रम

Subscribe

यंदा बीएससी अ‍ॅग्रीक्लचर, एमए हिंदी व मराठी या विषयांचे प्रवेश सुरु केले जाणार आहेत. तसेच, पुढील वर्षी सर्व परीक्षा केंद्रांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा निर्धार मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. ई. वायुनंदन यांनी व्यक्त केला.

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातर्फे चालविण्यात येणार्‍या पदविका, पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमासाठी प्रत्येक वर्षी साधारणत: साडेसहा लाख विद्यार्थी प्रविष्ठ होतात. व्यवसाय, नोकरी व सैनिकी क्षेत्रात कार्यरत असलेल्या व्यक्तींना मुक्त शिक्षणाचे प्रवेशव्दार यंदाही खुले झाले असून, यंदा बीएससी अ‍ॅग्रीक्लचर, एमए हिंदी व मराठी या विषयांचे प्रवेश सुरू केले जाणार आहेत. परीक्षा अत्यंत पारदर्शी पध्दतीने घेण्यासाठी परीक्षार्थीच्या हातांचे ठशांची (थम्ब) पडताळणी करण्यात आली. तसेच, पुढील वर्षी सर्व परीक्षा केंद्रांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा निर्धार मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. ई. वायुनंदन यांनी व्यक्त केला.

विद्यापीठ स्थापनेमागील उद्देश काय?

डॉ. वायुनंदन : शैक्षणिक विकास आणि पुनर्रचनेचा महाराष्ट्राला फोर मोठा वारसा आहे. महात्मा ज्योतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, डॉ. पंजाबराव देशमुख, कर्मवीर भाऊराव पाटील, स्वामी रामानंद तीर्थ यांच्यासारख्या थोर विचारवंतांचे या राज्यातील शैक्षणिक विकासाच्या चळवळीत मोठे योगदान आहे. याच परंपरेला अनुसरून महाराष्ट्र शासनाच्या विधीमंडळाने १ जुलै १९८९ रोजी या विद्यापीठाची स्थापना करून त्यास महाराष्ट्राचे थोर नेते व आधुनिक महाराष्ट्राचे जनक यशवंतराव चव्हाण यांचे नाव दिले. या विद्यापीठाचे तांत्रिक शिक्षणक्रम संबंधित वैधानिक संस्थांकडून मान्यता प्राप्त आहेत. या विद्यापीठाचे सर्व पदवी आणि पदव्युत्तर शिक्षणक्रम विद्यापीठ अनुदान केंद्राकडून मान्यता प्राप्त असून अन्य मान्यताप्राप्त विद्यापीठांच्या शिक्षणक्रमांशी समकक्ष आहेत.

- Advertisement -
मुक्त विद्यापीठात कोण प्रवेश घेऊ शकतो?

डॉ. वायुनंदन : मुक्त विद्यापीठातर्फे विविध प्रमाणपत्र, पदविका, पदवी, पदव्युत्तर आणि संशोधक अशा पातळीवरील शिक्षणक्रम उपलब्ध झाल्यामुळे नोकरी, व्यावसाय करणारी व्यक्ती किंवा सैनिकांच्या शिक्षणाचे स्वप्न पूर्ण करणे शक्य झाले. अनेकांना काही कारणास्तव शिक्षण अर्धवट सोडावे लागते. शिक्षणाचे अर्धवट राहिलेले त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मुक्त विद्यापीठाची स्थापना झाली. दहावी उत्तीर्ण किंवा अनुउत्तीर्ण असलेला व्यक्ती मुक्त विद्यापीठात प्रवेश घेऊ शकतो. वेगवेगळ्या अभ्यासक्रमासाठी भिन्न पात्रता आवश्यक असून त्याविषयी सविस्तर माहिती विद्यापीठाच्या संकेतस्थळावर 24 तास उपलब्ध आहे.

विद्यापीठाच्या विद्याशाखा आणि विभागीय केंद्राविषयी…
  • डॉ. वायुनंदन :  विद्यापीठातील एकूण 10 विद्याशाखांमार्फत सुमारे 125 अभ्यासक्रम चालविले जातात. यात शैक्षणिक सेवा विभाग, कृषी विज्ञान विद्याशाखा, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखा, संगणक शास्त्र विद्याशाखा, निरंतर शिक्षण विद्याशाखा, शिक्षणशास्त्र विद्याशाखा, आरोग्य विज्ञान विद्याशाखा, मानव्य विद्या व सामाजशास्त्र विद्याशाखा, वास्तुकला, कृषी विज्ञान केंद्र, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचा समावेश आहे. त्यासाठी राज्यभरात विद्यापीठाने अमरावती, औरंगाबाद, मुंबई, नागपूर, नाशिक, पुणे, कोल्हापूर, नांदेड येथे विभागीय केंद्र स्थापन केले आहेत. या सर्व केंद्रावरील विद्यार्थ्यांचे प्रवेश ऑनलाईन पध्दतीने होतात.
परीक्षा पध्दतीत काय बदल?
  • डॉ. वायुनंदन : मुक्त विद्यापीठातर्फे घेण्यात येणार्‍या परीक्षांमध्ये अधिक पारदर्शकता आणण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. चालू वर्षी झालेल्या परीक्षांमध्ये प्रत्येक विद्यार्थ्याच्या बोटांचे ठसे (थम) घेवून ते जुळल्यानंतरच परीक्षा केंद्रात प्रवेश देण्यात आला. त्यामुळे दुसरा विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ठ होण्यास प्रतिबंध घालण्यात यश आले. आता पुढील वर्षापासून प्रत्येक परीक्षा केंद्रात सीसीटीव्ही कॅमेरे बसविणार आहोत. त्यामुळे मास कॉपी प्रकार बंद होतील आणि अत्यंत पारदर्शकपणे परीक्षा पार पडतील.
अभ्यासक्रमांमध्ये काही बदल झाले आहेत का?
  • डॉ. वायुनंदन : मुक्त विद्यापीठातर्फे चालविण्यात येणारे अभ्यासक्रम हे विद्यापीठ अनुदान आयोगातर्फे प्रमाणित असल्यामुळे त्यांना शासन मान्यता आहे. प्रमाणपत्र, पदविका, पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाचे सुमारे 125 अभ्यासक्रम चालविले जातात. तसेच एज्युकेशन, डिस्टन्स एज्युकेशन, अर्थशास्त्र व रसायनशास्त्र या चार अभ्यासक्रमांसाठी पीएच.डी. पदवी दिली जाते. यात बीएससी अ‍ॅग्रीकल्चर, एमए मराठी व हिंदी या विषयांची भर पडणार आहे. विद्यापीठाचे सर्व प्रवेश प्रक्रिया https://www.ycmou.ac.in या संकेतस्थळावरुन होते. चालू वर्षीची प्रवेश प्रक्रिया सुरु झाली असून 15 जुलैपर्यंत प्रवेश घेता येणार आहे.
Kiran Kawade
Kiran Kawadehttps://www.mymahanagar.com/author/kiran-kawade/
गेल्या १० वर्षांपासून पत्रकार म्हणून कार्यरत. राजकीय, शैक्षणिक आणि कृषी विषयांवर विपुल लेखन. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -