निवृत्त पोलिस अधिकाऱ्याच्या घरी घरफोडी

निवृत्त पोलीस उपनिरीक्षक गुलाब किसन जगताप हे कुटुंबियांसह गुढीपाडव्यानिमित्त निफाड तालुक्यातील नांदुर्डी गावी आले. त्यांच्या घराचा दरवाजाचे कुलूप तोडून चोरट्यांनी दागिन्यांसह ८५ हजारांचा ऐवज लंपास केला.

Nashik
robbery case
प्रातिनिधीक फोटो

निवृत्त पोलीस उपनिरीक्षक गुलाब किसन जगताप हे कुटुंबियांसह गुढीपाडव्यानिमित्त निफाड तालुक्यातील नांदुर्डी गावी आले. त्यांच्या घराचा दरवाजाचे कुलूप तोडून चोरट्यांनी दागिन्यांसह ८५ हजारांचा ऐवज लंपास केला. गावावरून जगताप यांच्या सूनबाई घरी आल्या घरफोडी झाल्याचे लक्षात आले. ही घटना जनरल वैद्यनगरमधील आस्था सोसायटीत घडली. याप्रकरणी गुलाब जगताप यांनी मुंबईनाका पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

गुलाब जगताप हे कुटुंबियासह रविवारी (ता. ७) रोजी दोन दिवसांसाठी गुढीपाडव्यानिमित्त नांदुर्डी गावे आले. गुढीपाडव्याचा सण साजरा झाल्यानंतर त्यांच्या सूनबाई वैद्यनगरमधील आस्था सोसायटीतील सदनिकेत आल्या. त्यावेळी त्यांच्या घरात घरफोडी झाल्याचे समजले. त्यांनी तात्काळ सासर्‍यांशी संपर्क साधला. गुलाब जगताप यांनी तात्काळ मुंबईनाका पोलीस ठाण्याशी संपर्क साधत मुलाच्या घरी घरफोडी झाल्याची माहिती दिली तर सूनबाईला कोणत्याही घरातील वस्तूला हात लावू नये, असे सांगितले. त्यानंतर जगताप हे तात्काळ नांदुर्डीवरून आस्था सोसायटीत पोलिसांसमवेत आले. चोरट्यांनी घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. घरातील दागिने, रोकड असा एकूण ८५ हजार 500 रूपयांचा ऐवज लंपास केला. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शिंदे करत आहेत.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here