घरमहाराष्ट्रनाशिकपंचवटीत मोकाट जनावरांमुळे उलटली बस

पंचवटीत मोकाट जनावरांमुळे उलटली बस

Subscribe

मोकाट जनावरासह दुचाकी अचानक आडवी आल्याने एसटी महामंडळाची बस उलटल्याची घटना सोमवारी, १५ एप्रिलला सायंकाळी दिंडोरी रोडवरील मायको रुग्णालयासमोर घडली. सुदैवाने बसचा वेग कमी असल्याने मोठी दुर्घटना टळली.

मोकाट जनावरासह दुचाकी अचानक आडवी आल्याने एसटी महामंडळाची बस उलटल्याची घटना सोमवारी, १५ एप्रिलला सायंकाळी दिंडोरी रोडवरील मायको रुग्णालयासमोर घडली. सुदैवाने बसचा वेग कमी असल्याने मोठी दुर्घटना टळली. यानिमित्ताने महापालिकेची डोळेझाक असलेला शहरातील मोकाट जनावरांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

कळवण तालुक्यातील सप्तश्रुंगी गडावरुन प्रवाशांना घेऊन ही बस नाशिकच्या दिशेने येत होती. सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास दिंडोरी रोडवर अचानक एक दुचाकी आणि मोकाट गाय बससमोर आली. या दोघांनाही वाचवताना बसचालकाचे बसवरील नियंत्रण गेल्याने बस रस्त्याकडेला उलटली. या घटनेत महिला वाहकासह पाच प्रवाशी जखमी झाली. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले.

- Advertisement -

दोन तास वीजपुरवठा खंडीत

या अपघातात बस थेट महावितरणच्या विद्युत फिडरवर जाऊन धडकल्याने, खांब तिरपा होऊन वीजपुरवठा खंडीत झाला होता. परिणामी, दिंडोरी रोड, मखमलाबाद नाका, मालेगाव स्टँडसह रविवार कारंजा परिसर अंधारात बुडाला होता. रात्री सव्वा आठ वाजेदरम्यान विद्युत पुरवठा सुरळीत झाला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -