गोंदे फाट्यावर एसटी बस अपघात, २० प्रवाशी जखमी

चालकाचे नियंत्रण सुटल्याने या बसने पुढील वाहनाला जोरदार धडक

Bus accident Gonde

नाशिक-मुंबई महामार्गावरील गोंदे फाट्याजवळ गुरुवारी (दि.१९) दुपारच्या सुमारास राज्य परिवहन महामंडळाच्या बसला अपघात झाला. चालकाचे नियंत्रण सुटल्याने या बसने पुढील वाहनाला जोरदार धडक दिली. सुदैवाने जिवितहानी टळली.

या अपघातात बसमधील २० ते २५ प्रवाशी किरकोळ जखमी झाले. ही बस कळवणहून मुंबईच्या दिशेने जात असताना हा अपघात झाला. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. अपघातानंतर जखमींना तातडीने रुग्णवाहिकांमधून रुग्णालयात हलविण्यात आले.