घरमहाराष्ट्रनाशिकबसच्या तिकीटामुळे झाली खूनाची उकल

बसच्या तिकीटामुळे झाली खूनाची उकल

Subscribe

मुंबई-आग्रा महामार्गावर मालेगाव-धुळेदरम्यान एका पेट्रोलपंपाजवळ अज्ञात मृतदेह आढळुन आला होता. याप्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. मृतदेहाजवळून मिळून आलेल्या बस तिकिटावरून अवघ्या सहा दिवसांत या गुन्हाचा उलगडा करण्यात स्थानिक गुन्हे शाखेस यश आले.

मुंबई-आग्रा महामार्गावर मालेगाव-धुळेदरम्यान एका पेट्रोलपंपाजवळ अज्ञात मृतदेह आढळुन आला होता. याप्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. मृतदेहाजवळून मिळून आलेल्या बस तिकिटावरून अवघ्या सहा दिवसांत या गुन्हाचा उलगडा करण्यात स्थानिक गुन्हे शाखेस यश आले.

मृत व्यक्तीच्या पत्नीचे  एका व्यक्तीशी असलेल्या प्रेमसंबधांतून ही घटना घडल्याचे स्पष्ट झाले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ४ जानेवारी रोजी मालेगाव-धुळेदरम्यान मुंबई-आग्रा महामार्गावर चिखलओहोळ शिवारात एका पेट्रोल पंपाजवळ ३५ ते ४० वर्षी वयोगटातील अज्ञात इसमाचा मृतदेह आढळून आला होता. मारेकऱ्यांनी त्याला जीवे ठार मारून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह थेट महामार्गावर फेकून देतानाच जाळण्याचाही अमानुष प्रयत्न केला होता. तालुका पोलीसांनी याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल केला होता. जिल्हा पोलीस प्रमुख डॉ. आरती सिंह, पोलीस अधीक्षक निलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक करपे यांच्यासह पथकाने तपास सुरू केला होता. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी मृत व्यक्तीच्या पँटच्या खिशात दोंडाईचा ते धुळे असे बस तिकीट आढळून आले होते. पोलिसांनी या गुन्हाचा तपास करताना धुळे जिल्ह्यातील बेपत्ता व्यक्तींची माहिती पडताळली. दरम्यान, धुळे शहरातील शनिनगर परिसरात मृत व्यक्तीशी साधर्म्य असलेला एक व्यक्ती काही दिवसांपासून बेपत्ता असून, तो ट्रॅव्हल्सवर काम करत असल्याची माहिती पथकास मिळाली.

- Advertisement -

हाच धागा पकडत पोलिसांनी चौकशी केली असता तो मृत व्यक्ती महेंद्र काशिनाथ परदेशी (रा. शनिनगर, धुळे ) येथील असल्याचे तपासात निष्पन्न झाले. पोलिसांनी तपासाची चक्र वेगाने फिरवल्यावर महेंद्र व त्याच्या पत्नीचे एका इसमावरून वाद असल्याचे समोर आले. पोलिसांनी तपासासाठी रुपाली महेंद्र परदेशी हिला ताब्यात घेतले. चौकशीत २ मार्च रोजी सायंकाळी महेंद्र व रुपाली यांच्यात वाद झाले होते. महेंद्र दारू पिऊन आला व त्याने रुपालीचा मित्र कैलास वाघ आपल्या घरी का येतो, असे विचारात रुपालीस मारहाण केली होती. दरम्यान, महेंद्र पुन्हा मारहाण करेल या भीतीने तिने कैलासला घरी बोलाविले. यावेळी त्यांच्यात झटापट झाली. त्यात मारहाण झाल्याने तो मरण पावल्याचे रुपाली व कैलास यांच्या लक्षात आले. कैलासने ३ मार्चला त्याचा मित्र बबलू चव्हाण व अन्य दोघा साथीदारांच्या मदतीने महेंद्रचा मृतदेह एका गाडीत नेऊन महामार्गावर फेकून दिल्याची कबुली रुपालीने पोलिसांना दिली. तसेच, महेंद्र व आपले प्रेमसंबध असल्याचे तिने कबुल केले. याप्रकरणी पोलिसांनी मयत रुपाली परदेशी व धनेश महादेव चव्हाण (रा. धुळे) यांना ताब्यात घेतले असून, आरोपी कैलास वाघ याचा पोलीस शोध घेत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -