Video | मोदींच्या ‘कॅन्वॉय’आधी रुग्णवाहिकेस मार्ग

पोलिसांच्या जागरुकतेमुळे सर्वत्र कौतुक

Nashik

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा झाल्यानंतर अटल मैदान ते मीनाताई ठाकरे स्टेडीयम हॅलिपॅडपर्यंत मोदींच्या विशेष वाहनाने ‘कॅन्वॉय’व्दारे जाणार होते. त्यासाठी शहर वाहतूक शाखेने औरंगाबाद नाका व स्वामीनारायण पोलीस चौकीच्या परिसरात सहायक पोलीस आयुक्त मंगलसिंग सूर्यवंशी यांनी पोलीस कर्मचार्‍यांच्या मदतीने सर्व बाजूची वाहतूक रोखली होती. तितक्यात औरंगाबाद रोडवर नांदूरनाक्याच्या दिशेने रुग्णवाहिका सायरन वाजवत आली.

नाशिक पोलिसांची जागरुकता, गाड्यांच्या ताफ्यातून दिली रुग्णवाहिकेला जागा

नाशिक पोलिसांची जागरुकता, गाड्यांच्या ताफ्यातून दिली रुग्णवाहिकेला जागा

आपलं महानगर – My Mahanagar ಅವರಿಂದ ಈ ದಿನದಂದು ಪೋಸ್ಟ್ ಮಾಡಲಾಗಿದೆ ಗುರುವಾರ, ಸೆಪ್ಟೆಂಬರ್ 19, 2019

 

मंगलसिंग सूर्यवंशी यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून वाहनचालक व नागरिकांना बाजूला करत रुग्णवाहिकेला मार्ग खुला करुन दिला. शहर पोलिसांनी रुग्णवाहिकेस मोदींच्या कॅन्वॉय आणि वाहनांच्या गर्दीतून रुग्णवाहिकेस मार्ग खुला केल्याने नाशिककरांना पोलिसांमधील माणुसकीचे दर्शन घडले.