घरताज्या घडामोडीजिल्हा रुग्णालयात कोरोनाचा शिरकाव; प्रशिक्षणार्थी डॉक्टरलाच करोना संसर्ग

जिल्हा रुग्णालयात कोरोनाचा शिरकाव; प्रशिक्षणार्थी डॉक्टरलाच करोना संसर्ग

Subscribe

नाशिक जिल्ह्यातील मालेगावसह इतर तालुक्यात कोरोना थैमान घालत आहे. जिल्हा रुग्णालयास रविवारी (दि.26) रात्री सहाजणांचे रिपोर्ट मिळाले असून ते सर्व रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. नवीन 5 कोरोनाबाधित रुग्ण येवला व एक  24 वर्षीय प्रशिक्षणार्थी डॉक्टर तळपाडा (सुरगाणा) येथील आहेत. ते जिल्हा रुग्णालयात आरोग्य सेवा बजावत आहेत. जिल्ह्यात आता 149 कोरोनाबधित रुग्ण झाले आहेत. जिल्हा रुग्णालयात व येवला तालुक्यात कोरोनाने शिरकाव केल्याने आरोग्य विभाग हादरून गेला आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासन व आरोग्य विभाग सर्वोतोपरी प्रयत्न करत आहे. तरी, कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. वाढत्या रुग्णांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नाशिक शहरात 11 रुग्ण असून एक रुग्ण बरा झाला आहे. नाशिक जिल्ह्यात आधी 5 कोरोनाबाधित रुग्ण होते. आता येवल्यात 5 असे एकूण जिल्ह्यात 11 रुग्ण झाले आहेत. येवल्यातील नवीन 5 पॉझिटिव्ह रुग्ण हाय रिस्क संपर्कातील आहेत. मालेगावात 127 कोरोनाबाधित रुग्ण असून 16 जणांचा मृत्यू झाला आहे. तर, एक कोरोनाबाधित रुग्ण जिल्हा रुग्णालयात प्रशिक्षणार्थी डॉक्टर म्हणून कार्यरत आहे. रुग्णालयातील आरोग्य कर्मचाऱ्यांमधीलच एक व्यक्ती पॉझिटिव्ह आल्याने आरोग्य विभागाची चिंता वाढली आहे. सदर रुग्ण कोरोना विभागाच्या ओपीडी विभागात कार्यरत असून म्हरुळमधील विजयनगरमध्ये वास्तव्यास आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -