घरमहाराष्ट्रनाशिक62 किलो गांजा पकडला; आठ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

62 किलो गांजा पकडला; आठ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

Subscribe

गुन्हे शाखा युनिट एकची कारवाई

शहरात महागड्या कारमधून विक्रीसाठी गांजा आणणार्‍या तीन संशयितांना गुन्हे शाखा युनिट 1 ला तपोवनातील जलशुद्धीकरण केंद्राजवळ जेरबंद केले. या संशयितांकडून 62 किलो गांजासह स्विफ्ट गाडी असा एकूण आठ लाख दहा हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, गुन्हे शाखा युनिट एकचे पोलीस उपनिरीक्षक बलराम पालकर यांना पोलिसांच्या खबर्‍यांकडून काही संशयीत नाशिक शहरात विक्री करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गांजा घेऊन येत असल्याचे समजले. त्याअनुषंगाने गुन्हे शाखा युनिट एकचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आनंद वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक महेश कुलकर्णी, उपनिरीक्षक बलराम पालकर, सहायक उपनिरीक्षक कारवाळ, हवालदार संजय मुळक, वसंत पांडव, दिघोळे, येवाजी महाले, बागूल, पोलीस नाईक शांताराम महाले, शिपाई गणेश वडजे, विशाल काठे, दीपक मोंढे, महिलाशिपाई पोखरकर यांनी सापळा रचून संशयीत धनराज पवार (रा.निफाड),युवराज मोहिते (रा.विडीकामगार नगर,आडगाव), प्रशांत नारळे (रा.कुमावतनगर) यांना तपोवनातील जलशुद्धीकरण केंद्राजवळ स्विफ्ट क्रमांक एम एच१२ एफयू ४०२० सह जवळपास 62 किलो गांजा असा एकूण आठ लाख दहा हजार रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे.

- Advertisement -

याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -