घरमहाराष्ट्रनाशिकभीतीपोटी केंद्र सरकारने केली निर्यातबंदी

भीतीपोटी केंद्र सरकारने केली निर्यातबंदी

Subscribe

काँग्रेसचा आरोप : इगतपुरी तहसील कार्यालयाबाहेर आंदोलन

नवी दिल्ली विधानसभेत पूर्वी कांद्यामुळे सत्ता गमवावी लागल्यापासून भाजप नेते कांदाप्रश्नी सावध झाले. यामुळे भीतीपोटी केंद्र सरकारने सोमवारी निर्यातबंदी केली. लॉकडाऊन उठताच कांद्याचे भाव थोडे वाढल्याने केंद्राने निर्यातबंदीचा निर्णय घेऊन शेतकर्‍यांवर अन्याय केला, असा आरोप इगतपुरी काँग्रेसने केला आहे.

यावर्षी मुसळधार पावसामुळे शेतकर्‍यांनी चाळीत साठवलेला निम्म्याहून अधिक कांदा खराब झाला. महाराष्ट्रातील चाळींमध्ये साठवलेल्या कांद्याची स्थितीही यापेक्षा वेगळी नाही. परिणामी आवक कमी होऊन उत्तम प्रतीच्या कांद्याचा भाव वधारला. आगामी बिहार राज्यातील निवडणुकीचे वेध भाजप सरकारला लागले असून बिहारच्या निवडणुकीत व्यग्र असलेल्या भाजपला कांदा भाववाढीमुळे धडकी भरली. याविरोधात काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब कुकडे व इगतपुरी काँग्रेस शहराध्यक्ष संतोष सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी केंद्राविरोधात तहसील कार्यालयावर आंदोलन करुन घोषणाबाजी केली. यानंतर निवासी नायब तहसीलदार प्रवीण गोंडाळे व दिनेश पाडेकर यांना निवेदन देण्यात आले.

- Advertisement -

आंदोलनात काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब कुकडे, पंढरीनाथ बर्‍हे, अरुण गायकर, दशरथ मालुंजकर, शहराध्यक्ष संतोष सोनवणे, कैलास घारे, तालुका संघटक सत्तार मनियार, विश्वजीत आहिरे, शरद झनकर, बाळासाहेब लंगडे, मारूती भगत, दशरथ मालुंजकर, प्रविण जैन, अरूण उबाळे, पंढरीनाथ लंगडे आदि उपस्थीत होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -