घरमहाराष्ट्रनाशिकनाशिक आंत्रप्रिनर फोरमतर्फे ६ एप्रिलला प्रख्यात उद्योजकांचे मार्गदर्शन

नाशिक आंत्रप्रिनर फोरमतर्फे ६ एप्रिलला प्रख्यात उद्योजकांचे मार्गदर्शन

Subscribe

'बिल्डिंग सस्टेनेबल' उपक्रमात प्रसिद्ध कलाकार सतिश कौशिक, सनदी अधिकारी प्रवीण दराडे, समाज माध्यम (सोशल मीडिया) तज्ज्ञ संजय मेहता, दिग्दर्शक मधुर भांडारकर,महिला उद्योजिका रेवती रॉय, गोली वडापावचे वैंकी अय्यर, ज्येष्ठ पत्रकार वेद प्रताप वैदीक आदी मार्गदर्शन करणार आहेत.

शहरासह जिल्ह्यातील होतकरु उद्योजकांना यशस्वी उद्योजकांचे मार्गदर्शन मिळून नाविन्यपूर्ण उदयोग सुरू व्हावेत, तसेच नवीन उद्योजक उदयास यावेत या उद्देशाने ‘नाशिक आंत्रप्रिनर फोरम’च्या वतीने ६ एप्रिल रोजी बिल्डिंग सस्टेनेबल एण्टरप्रायजेस उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यंदाही प्रख्यात उद्योजकांसह प्रसिद्ध कलावंत उपस्थित राहणार असल्याची माहिती फोरमचे संस्थापक अध्यक्ष संजय लोढा यांनी दिली.

नाशिकमध्ये शहरात गेल्या १० वर्षांपासून हा उपक्रम राबवला जातो आहे. या पार्श्वभूमीवर संस्थेने बोलाविलेल्या पत्रकार परिषदेत यंदाच्या आयोजनाबाबत माहिती देण्यात आली. या वेळी हर्षद मेहता व अजय बोहोरा आदी उपस्थित होते. हॉटेल एक्स्प्रेस इन येथे सकाळी ८ ते रात्री ८ वाजेदरम्यान होत असलेल्या उपक्रमात प्रसिद्ध कलाकार सतिश कौशिक, प्रख्यात गुंतवणूकदार नागराज प्रकासम, सनदी अधिकारी प्रवीण दराडे, समाज माध्यम (सोशल मीडिया) तज्ज्ञ संजय मेहता, दिग्दर्शक मधुर भांडारकर, सेलिब्रिटी डेंटिस्ट संदेश मयेकर, महिला उद्योजिका रेवती रॉय, गोली वडापावचे वैंकी अय्यर, ज्येष्ठ पत्रकार वेद प्रताप वैदीक, डॉ. पवन अग्रवाल, प्रसिद्ध यू-ट्युबर रणवीर हे वक्ते मार्गदर्शन करणार आहेत. उपक्रमात व्यावसायिक संवाद, मार्केटची सद्यस्थिती इ. विषयांवर मार्गदर्शन, चर्चासत्र, यशस्वी उद्योजकांचे अनुभव कथन असे विविध कार्यक्रम होतील.

- Advertisement -

उपक्रमात सहभागासाठी www.bizeventindia.com या वेबसाईटवर १ एप्रिलपर्यंत नावनोंदणी करावी अथवा ७४९८१०७४५७ अथवा ७४९८११७२२३ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहनही लोढा यांनी केले. उपक्रमाला विविध प्रसिद्ध संस्था व उद्योगांचे सहकार्य लाभले आहे. संस्थेच्या या उपक्रमाचा फायदा नाशिकमधील होतकरु तरुण उद्योजकांना होत आहे. या उपक्रमातून प्रेरणा घेत अनेकांनी उद्योग उभे केले आहेत. यापुढेही अनेक उद्योजक निर्माण व्हावेत, यासाठी संस्था प्रयत्नशील असल्याचे मान्यवरांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -