श्रीरामाच्या जयघोषात रंगला रथोत्सव

भाविकांचा प्रचंड उत्साह, रामनामाचा जयघोषाने भारावलेले वातावरण आणि सजवलेल्या श्रीराम, गरुडरथाची दिमाखात निघालेली मिरवणूक... अशा उत्साहात मंगळवारी, १६ एप्रिलला रथोत्सव रंगला होता.

Nashik
जयघोषात निघालेल्या रथोत्सवात भाविकांचा असा प्रचंड उत्साह कायम होता.

भाविकांचा प्रचंड उत्साह, रामनामाचा जयघोषाने भारावलेले वातावरण आणि सजवलेल्या श्रीराम, गरुडरथाची दिमाखात निघालेली मिरवणूक… अशा उत्साहात मंगळवारी, १६ एप्रिलला रथोत्सव रंगला होता. पंचवटीतील श्री काळाराम मंदिरापासून सुरू झालेल्या रथांच्या मिरवणुकीची गोदाकाठी सांगता झाली.

पंचवटीच्या श्री काळाराम मंदिर परिसरातून मंगळवारी, १६ एप्रिलला सायंकाळी ५ वाजता रथात श्रीराम उत्सवमूर्ती व पादुका ठेवून रथोत्सवाला सुरुवात झाली. या पार्श्वभूमीवर वाहतूक शाखेने मिरवणूक मार्गावरील वाहतूक अन्य मार्गाने वळवली होती. या सोहळ्याला भाविकांची मोठी उपस्थिती होती. मिरवणुकीत लोकसभा निवडणुकीसाठी उभे राहिलेले विविध पक्षांचे उमेदवार, पदाधिकारी, राजकीय नेते यांचीही रथावर स्वार होण्यासाठी चढाओढ दिसून आली.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here