घरमहाराष्ट्रनाशिकनागरिकांची फसवणूक; ठेका रद्द होऊनही गुजरात इन्फोटेककडून अर्ज स्वीकृती

नागरिकांची फसवणूक; ठेका रद्द होऊनही गुजरात इन्फोटेककडून अर्ज स्वीकृती

Subscribe

दाखला घेण्यासाठी गेलेल्या नागरिकांना सेतू बंद झाल्याची कारणे सांगितली जातात

सेतू कार्यालयाचा ठेका रद्द करूनही गुजरात इन्फोटेककडून अर्ज स्वीकृती सुरूच असल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहे. शहरातील चार केंद्रावर ही अर्ज स्वीकृती सुरू असून दाखला घेण्यासाठी गेलेल्या नागरिकांना सेतू बंद झाल्याची कारणे सांगितली जात आहेत. त्यामुळे आता दाखल केलेल्या अर्जांचे काय, असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे.

२०१६ मध्ये ऑनलाईन निविदा प्रक्रियेने गुजराज इन्फोटेक या कंपनीला जिल्ह्यातील तालुकास्तरावरील १४ सेतू वगळून नाशिक शहर आणि नाशिक तालुका ग्रामीण सेतू केंद्र चालवण्यात देण्यात आले होते. १ एप्रिल २०१६ ते ३१ मार्च २०१९ या मुदतीत हे केंद्र सुरू ठेवावे, असे कार्यारंभ आदेशही देण्यात आले होेते. मात्र, सेतू कार्यालयात बोकाळलेली एजंटगिरी, नागरीकांच्या प्राप्त होणारी तक्रारी, सेतू कार्यालयातून नागरिकांचे अर्ज गहाळ होणे, अशा प्रकारच्या तक्रारी प्राप्त होऊ लागल्याने तत्कालीन जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी या सेतू कार्यालयाचा ठेका रदद करत दाखल्यांसाठी ऑनलाईन पद्धतीचा अवलंब केला. मात्र, या विरोधात संबधित सेतू चालकाने न्यायालयात धाव घेतली.

- Advertisement -

दरम्यानच्या काळात कार्यारंभ आदेशातील अट क्र. १४ नुसार केंद्राला १ एप्रिल २०१९ पासून २३ मे २०१९ पर्यंत मुदवाढ देण्यात आल्याचे समजते. मुदतवाढ देताना आचारसंहितेचा कालावधी संपेपर्यंत असेल, असेही नमूद करण्यात आले. मात्र आजही मेरी, सिडको, सातपूर, नाशिकरोड येथे गुजरात इन्फोटेक मार्फत या ठिकाणी सेतू केंद्र कार्यरत असल्याचे दिसून येते. सध्या महाविद्यालयीन प्रवेश प्रक्रिया सुरू असल्याने अनेक विद्यार्थ्यांनी या केंद्रात दाखल्यांसाठी अर्ज सादर केले. या सेतू चालकाने हे दाखले स्वीकारलेही याकरता लागणारे शुल्क आकारून त्याची पावतीही देण्यात आली. मात्र, दाखले घेण्यासाठी पुन्हा या केंद्रावर गेलेल्या विद्यार्थी व पालकांना हे केंद्र बंद झाल्याचे सांगण्यात येत असल्याने विद्यार्थ्यांच्या महाविद्यालयीन प्रवेशाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

प्रशासन अनभिज्ञ

यासंर्दभात प्रशासनाला विचारणा केली असता याबाबत अनभिज्ञता दर्शविण्यात आली. मात्र शहरात सुरू असलेल्या महाऑनलाईन केंद्रांबाबत संकेतस्थळावर यादी प्रसिद्ध करण्यात येईल, असे सांगण्यात आले. मात्र, ज्या विद्यार्थ्यांनी या केंद्रात अर्ज दाखल केले, त्या अर्जांबाबत काय हा प्रश्न मात्र अनुत्तरित आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -