घरमहाराष्ट्रनाशिकबनावट वाटपपत्राद्वारे ३.१७ कोटींचा अपहार

बनावट वाटपपत्राद्वारे ३.१७ कोटींचा अपहार

Subscribe

भूसंपादन कार्यालयात रक्कम जमा करण्यास टाळाटाळ; १७ जणांवर गुन्हा दाखल

औद्योगिक वापरासाठी आरक्षित असलेली जमीन स्वत:ची असल्याचे भासवत निफाड, चांदवड व दिंडोरी या तालुक्यातील १७ जणांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील भूसंपादन विभागाकडून ३ कोटी १७ लाख ६२ हजार रुपये लाटल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी राहुल अशोक तुपलोंढे (रा.श्रीरंगनगर, नाशिक) यांनी सरकारवाडा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलिसांनी १७ जणांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

आक्राळे शिवार (ता. दिंडोरी) येथील गट क्रमांक ३३/२ ही जमीन औद्योगिक वापरासाठी आरक्षित करण्यात आली आहे. गट क्रमांक ३३/२ या जमिनीचे मालक नसतानाही १७ जणांनी जमिनीचे मालक असल्याचे भूसंपादन कार्यालयास भासवले. तसे वाटपपत्र तयार करून नावांची यादी २६ सप्टेंबर २०१४ ते ११ एप्रिल २०१९ या कालावधीत भूसंपादन कार्यालयाचे तत्कालीने अधिकारी भीमराव शिंदे यांच्याकडे सादर केली. याप्रकरणी राहुल अशोक तुपलोंढे यांच्या आत्याने दाखल केलेल्या हरकतीचा विचार न करता शिंदे यांनी १७ जणांना जमीन भूसंपादनाचा मोबदला म्हणून ३ कोटी १७ लाख ६२ हजार ५०० रुपये दिले. रावसाहेब गायकवाड, बेबीताई शिंदे, भाऊसाहेब गायकवाड, अनिता गवळी, देविदास गायकवाड, सुनंदा गायकवाड यांच्या नावे रक्कम ट्रान्सफर केली. दरम्यान, राहुल तुपलोंढे यांच्या आत्याने भूसंपादन कार्यालयाकडून रक्कम मिळावी, यासाठी कार्यालयाकडे अर्ज केला. मात्र, त्यांना रक्कम देण्यास टाळाटाळ केली. याप्रकरणी तुपलोंढे यांनी सरकारवाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक घुगे तपास करीत आहेत.

- Advertisement -

यांनी केली फसवणूक

हिराबाई भिका गायकवाड, सोमनाथ भिका गायकवाड (दोघेही रा.चांदोरी, ता.निफाड), माया मनोज मनोज गवळी, अनिता रतन गवळी (दोघीही रा.खडकजांब, ता.चांदवड), आशा बाळू मोरे, देविदास रंगनाथ गायकवाड, रावसाहेब रंगनाथ गायकवाड, भाऊसाहेब रंगनाथ गायकवाड ( चौघेही रा.आक्राळे, नाशिक), प्रकाश खंडेराव गायकवाड, मोहन खंडेराव गायकवाड, किसनाबाई रंगनाथ गायकवाड, सुनंदा खंडेराव गायकवाड (रा.पिंपळगांव, ता.निफाड), लंकाबाई अशोक दरेकर (रा.आक्राळे,नाशिक), शंकुतला रामनाथ पवार (रा.सिन्नर), बेबीताई शंकर शिंदे (रा.निफाड), योगिता किशोर सागर (रा.म्हसरूळ), ललिता धंनजय जगताप (रा.सिन्नर).

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -