घरमहाराष्ट्रनाशिकऑनलाईन विरोधात केमिस्टचा हल्लाबोल

ऑनलाईन विरोधात केमिस्टचा हल्लाबोल

Subscribe

दिल्ली उच्च न्यायालयानेसुद्धा 'ऑनलाइन औषध विक्रीबाबत ठोस नियम लागू होत नाहीत, तोपर्यंत त्यावर घालण्यात आलेली बंदी कायम राहील’, असा आदेश दिला होता. पण, अद्याप या आदेशाची अंमलबजावणी झालेली नाही. यामुळे केमिस्ट अ‍ॅण्ड ड्रगिस्ट संघटनेने मंगळवारी मूक आंदोलन करीत या विधेयकाविरोधात हल्लाबोल केला.

ऑनलाईन औषध विक्रिला केमिस्ट अ‍ॅण्ड ड्रगिस्ट संघटनेने विरोध दर्शविला आहे. ऑनलाइन फार्मसीसंदर्भात केंद्र सरकार तयार करत असलेल्या विधेयकाविरोधात संघटना पुन्हा एकवटल्या आहेत. काही दिवसांपूर्वीच दिल्ली उच्च न्यायालयानेसुद्धा ‘ऑनलाइन औषध विक्रीबाबत ठोस नियम लागू होत नाहीत, तोपर्यंत त्यावर घालण्यात आलेली बंदी कायम राहील’, असा आदेश दिला होता. पण, अद्याप या आदेशाची अंमलबजावणी झालेली नाही. यामुळे केमिस्ट अ‍ॅण्ड ड्रगिस्ट संघटनेने मंगळवारी मूक आंदोलन करीत या विधेयकाविरोधात हल्लाबोल केला.

काय आहे नेमकं प्रकरण?

नाशिक येथे मंगळवारी गोळे कॉलनीत सकाळी ११ वाजता सर्व ओैषध विक्रेते एकत्रित आले. मात्र स्मार्ट सिटीचे काम सुरू असल्याने मोर्चा काढणे शक्य नसल्याने तसेच मोर्चाला परवानगी नसल्याने असोसिएशनच्या प्रमुख पदाधिकार्‍यांनी जिल्हाधिकारी, अन्न औषध प्रशासन सहायक आयुक्त यांची भेट घेत निवेदन दिले. निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांनी निवेदन स्विकारले. दिल्ली उच्च न्यायालयाने १३ डिसेंबर २०१८ ला ऑनलाइन औषध विक्रीवर देशभरात बंदी घालण्याचा निर्णय दिला होता. त्या निर्णयाविरुद्ध ई-फार्मसी कंपन्यांनी ही बंदी मागे घ्यावी, अशी मागणी करीत याचिका दाखल केली. त्यावर मुख्य न्यायाधीश राजेंद्र मेनन आणि न्यायाधीश व्ही. के. राव यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. त्यावेळी ऑनलाइन औषधविक्रीवर नियंत्रण ठेवण्यासाठी सध्या कोणतेही नियम अस्तित्वात नाहीत. ही खरी समस्या असून, हे नियम अमलात आल्यानंतर कंपन्या पूर्वीप्रमाणे औषधविक्री करू शकतात. मात्र, तोपर्यंत त्यावरील बंदी कायम राहील, असे स्पष्ट करण्यात आले. यामुळे आजघडीला देशात सुरू असलेली औषधांची ऑनलाइन विक्री अवैध असल्याचा दावा केमिस्ट अ‍ॅण्ड ड्रगिस्ट असोसिएशनने केला आहे. संघटनेच्या मते, ऑनलाइन फार्मसीच्या माध्यमातून देशभरात बेकायदेशीरपणे व्यवसाय सुरू आहे. ऑनलाईन औषधीमुळे होणार्‍या नुकसानीबाबत प्रत्येक वेळेस शासनास निवेदन देउन कळविले आहे. मात्र शासनाने याची कोणतीही दखल घेतली नसल्याचे असोसिएशनचे सचिव राजेंद्र धामणे यांनी सांगितले. ऑनलाइन फार्मसीच्या मुद्यावरून यापूर्वी २८ सप्टेंबर २०१८ ला एकदिवसीय बंद पाळण्यात आला होता. हल्लाबोल आंदोलनाचा रुग्णांना फटका बसू नये, यासाठी दुकाने सुरू ठेवण्यात आली होती. यावेळी प्रशांत पवार, योगेश बागरेचा, अभय बुरड, संदीप शेवाळे, महेश भावसार, योगेश कदम, सुदेश आहेर, रत्नाकर वाणी, विनोद बाविस्कर, निलेश शिरोडे, हिरालाल पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते.

- Advertisement -

का होतोय विरोध?

याद्वारे नार्कोटिक्स ड्रग्ज, झोपेची औषधे, गर्भपाताच्या गोळ्या यांसारख्या अनेक धोकादायक औषधांची विक्री सुरू आहे. यामुळे मानवी जिवितास हानी पोहचू शकते. औषधांच्या दुष्परिणामांपासून सामान्य जनतेस वाचविणे, हा आंदोलनामागचा मूळ उद्देश असल्याचे धामणे यांनी सांगितले. डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय अ‍ॅन्टीबायोटिक्स, वेदनाशामक अथवा अन्य औषधांच्या वापरास चालना मिळते. युवकांमध्ये नशेच्या औषधांच्या वापराचा मोठा धोका आहे. ऑनलाईन फार्मसीमुळे औषधविक्रेते आणि कर्मचार्‍यांच्या परिवारावर आर्थिक संकट येणार आहे. त्यामुळे औषध विक्रेत्यांचा ऑनलाइन फार्मसीला विरोध आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -