घरमहाराष्ट्रनाशिकसिडकोत आज सकाळचा पाणीपुरवठा विस्कळीत

सिडकोत आज सकाळचा पाणीपुरवठा विस्कळीत

Subscribe

शहरात रविवारी सायंकाळी खंडीत झालेल्या वीजपुरवठ्याचा परिणाम सिडकोमधील सोमवारी, १५ एप्रिलच्या पाणीपुरवठ्यावर होणार आहे.

शहरात रविवारी सायंकाळी खंडीत झालेल्या वीजपुरवठ्याचा परिणाम सिडकोमधील सोमवारी, १५ एप्रिलच्या पाणीपुरवठ्यावर होणार आहे. गंगापूर धरणावरील वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी रविवारी रात्री उशिरापर्यंत प्रयत्न सुरू होते. या धरणावरील दोन्हीही फिडर बिघडल्याने पाणीपुरवठा विस्कळीतपणे होणार असल्याची माहिती महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या वतीने देण्यात आली.

शहरात झालेल्या वादळी पावसामुळे गंगापूर धरणावरील वीजपुरवठादेखील खंडीत झाला होता. पाण्याच्या पंपिंगसाठी येथे ३३ के.व्ही. क्षमतेचे दोन फिडर बसविण्यात आले आहेत. त्यात रविवारी बिघाड झाल्याने रात्री उशिरापर्यंत अपेक्षित पाणी पंप झालेले नव्हते. त्यामुळे सिडकोमध्ये सकाळी होणारा पाणीपुरवठा कमी दाबाने होईल किंवा काम पूर्ण न झाल्यास होणार नाही. नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहनही महापालिका प्रशासनाने केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -