घरमहाराष्ट्रनाशिककोथिंबिरीचे दर 50 टक्के घटले

कोथिंबिरीचे दर 50 टक्के घटले

Subscribe

बाजार समितीत आवक वाढली

नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत कोथिंबिरीला हजारो रूपये शेकडा दर मिळतोय, ही माहिती मिळाल्याने आज बाजार समितीत लिलावासाठी लगतच्या जिल्ह्यातील कोथिंबिरीची आवक वाढली.लिलावात आवक वाढल्याने कोथिंबिरीचे दर 50 टक्के घटले. आज लिलावात कोथिंबिर सरासरी शेकडा 5 हजार रुपये दराने विक्री झाली.

बाजार समितीत कमी आवकेमुळे कोथिंबिरी सरासरी 17 ते 18 हजार रुपये दराने विक्री होत होती. तसेच सर्वोच्च दर शेकडा 33 हजारापर्यंत पोहोचलेला होता. हा बाजार भाव राज्यातील इतर कोथिंबीर उत्पादकांनी जाणून घेतला होता. त्यामुळे जादा वाहतुक खर्च करण्यास तयारी दर्शवून आज मुंबईला लातूर, नागपूर आणि पुण्यातून कोथिंबीर विक्रीस आलेली होती. ही बाजारपेठ नाशिकच्या कोथिंबिरीसाठीही असल्याने तेथे इतर जिल्ह्यातील कोथिबिरीची नाशिकच्या कोथिंबिरीला स्पर्धा निर्माण झाली. त्यामुळे दर थेट 50 टक्के घसरले. त्याचबरोबर नाशिक जिल्ह्यातूनही आता कळवणसह, दिंडोरी, निफाड आणि नाशिक तालुक्यातील कोथिंबिरीची आवक सुरु झालेली आहे. त्यामुळे आवकेचे प्रमाण वाढलेले आहे. आज लिलावात कोथिंबीर कमीत 3 हजार रूपये , सर्वाधिक 6 हजार रूपये तर सरासरी 5 हजार रूपये दराने विक्री झाल्याचे व्यापारी राजू आंधाळे यांनी माहिती देताना सांगितले.

- Advertisement -

आज पाऊस उघडलेला असल्याने बाजार समितीत सुमारे 65 हजार जुड्यांची आवक झालेली होती. ही आवक दूप्पट झालेली होती. त्यामुळे दर घसरण सुरु झालेली आहे. मुंबई, सुरत आणि बर्‍हाणपूर येथे जाणार्‍या नाशिकच्या कोथिंबिरीला तेथील स्थानिक कोथिंबिरीचा स्पर्धा होतीच पण, या बाजार समित्यांमध्ये नाशिकसह इतर जिल्ह्यातील कोथिंबिरीचीही आवक दराची स्पर्धा निर्माण करीत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -