घरमहाराष्ट्रनाशिकजाळपोळप्रकरणी CISFचा पोलीस अधिकारीच संशयित

जाळपोळप्रकरणी CISFचा पोलीस अधिकारीच संशयित

Subscribe

नाशिक रोडच्या उपनगर भागातील सीआयएसएफ (औद्योगिक सुरक्षा दल) जवानांच्या क्वॉर्टरमधील कार आणि मोटरसायकल अशा १० वाहनांच्या जाळपोळीमागे सीआयएसएफमधील पोलिस अधिकार्‍याचाच हात असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे.

नाशिक रोडच्या उपनगर भागातील सीआयएसएफ (औद्योगिक सुरक्षा दल) जवानांच्या क्वॉर्टरमधील कार आणि मोटरसायकल अशा १० वाहनांच्या जाळपोळीमागे सीआयएसएफमधील पोलिस अधिकार्‍याचाच हात असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. संबंधित पोलिस अधिकार्‍याने नैराश्यातून हा प्रकार केल्याचा संशय असून यादृष्टीने पोलिस तपास सुरू असल्याची माहिती पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांनी दिली.

उपनगर पोलिस हद्दीतील नोट प्रेसच्या जागेतील औद्योगिक सुरक्षा दलाच्या क्वॉर्टरच्या पार्किंगमध्ये बुधवारी मध्यरात्री अज्ञात समाजकंटकांनी आग लावल्याची घटना घडली होती. या घटनेमुळे स्थानिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. त्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी परिसरात मोठी कोम्बिंग ऑपरेशनही हाती घेतले होते. मात्र त्यातून फारसे काही हाती लागले नव्हते. दरम्यान, या घटनेतील तपासादरम्यान काही दुवे हाती लागले असून, त्यात संशयित म्हणून एका पोलिस अधिकार्‍याचे नाव पुढे आल्याची माहिती पोलिस आयुक्तांनी पत्रकार परिषदेत दिली.

- Advertisement -

सहायक पोलिस अधिकारी ए. के. सिंग हे काही दिवसांपासून नैराश्याच्या गर्तेत असून त्यांच्या स्वतःच्या ३ दुचाकी व २ कार आहेत. नैराश्यातून हा प्रकार घडल्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने तपास सुरू असल्याचेही पोलिस आयुक्तांनी सांगितले.
औद्योगिक सुरक्षा दलाचे जवान संजयकुमार नरहरी बनसोडे यांच्या तक्रारीवरुन उपनगर पोलिसांनी जाळपोळ प्रकरणी गुन्हा दाखल केला होता. तसेच, त्यादृष्टीने तपास सुरू आहे. या जाळपोळ सोसायटीच्या आवारात पार्क केलेली सुमारे १० वाहने जाळून टाकण्यात आली होती. त्यात दुचाकींसह एका चारचाकी वाहनाचाही समावेश होता.

या घटनेनंतर स्थानिकांमध्ये निर्माण झालेल्या भीतीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी गुरुवारी रात्री या भागातील आम्रपाली व आंबेडकर वाडी येथे कोम्बिंग ऑपरेशन करत २२ टवाळखोरांना ताब्यात घेतले होते. तसेच, १३७ वाहनांची तपासणी करत ७ संशयित वाहने ताब्यात घेतली होती.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -