नागरिकांनी अत्यावश्यक व जीवनावश्यक वस्तूंसाठीच घराबाहेर जाण्यासाठी पॉलिसांशी संपर्क करावा. अनावश्यक सेवेसाठी काहीजण संपर्क करत असल्याने हेल्पलाईनवर ताण येत आहे. नागरिकांनी वारंवार मेसेज व कॉल करू नये, असे आवाहन पोलीस आयुक्तालयातर्फेे करण्यात आले आहे.
करोनाच्या पार्श्वभूमीवर शहरात संचारबंदी व जमावबंदी लागू करण्यात आली आहे. अत्यावश्यक सेवा व जीवनावश्यक वस्तू खरेदी कुटूंबातील एकाच व्यक्तीस घराबाहेर जाता यावे, त्यांना अडचण येवू नये, यासाठी पोलीस आयुक्तालयातर्फे मदतीसाठी पोलीस अधिकाऱ्यांचे व्हॉट्सअप क्रमांक प्रसिद्ध करण्यात आले आहेत. त्यानुसार शहरातील नागरिक अनावश्यक सेवेसाठी संपर्क साधत आहेत. काहीजण वारंवार मेसेज करत आहेत. अनेकजण एकाच मोबाईल क्रमांकावर मेसेज व कॉल करत आहेत. त्यामुळे हेल्पलाईनवर ताण येत आहे.
ऑनलाईन अर्जासाठी लिंक
Http://Carina.nashikcitypolice.gov.in
संपर्कासाठी मोबाईल क्रमांक
7248922877
8485810477
9403165132
7709295534
7248906877
7058946877
7248903877
9373800019
7350166999
7020583176
9403165140