घरमहाराष्ट्रनाशिकधक्कादायक : ‘सिव्हिल’मध्ये पुन्हा चोरी

धक्कादायक : ‘सिव्हिल’मध्ये पुन्हा चोरी

Subscribe

रुग्ण सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर; वैद्यकीय उपकरणांवरही चोरट्यांचा डल्ला

जिल्हा शासकीय रुग्णालयात दिवसाढवळ्या चोरींचे प्रकार होत असल्याची धक्कादायक बाब ‘आपलं महानगर’ने पुराव्यासह प्रसिद्ध केल्यानंतर लगेचच वैद्यकीय उपकरण चोरीचा गुन्हा रुग्णालय व्यवस्थापनाने सरकारवाडा पोलीस स्टेशनमध्ये दाखल केला आहे. रुग्णालयातील नेत्र तपासणी विभागातील ऑप्थाल्मास्कोप उपकरण चोरट्यांनी लंपास केल्याचेे या तक्रारीत म्हटले आहे. रुग्णालय परिसरात सुरक्षारक्षक तैनात असतानाही चोरट्याने भरदिवसा डल्ला मारल्याने संपूर्ण व्यवस्थेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित होेत आहे.

गुरुवारी (ता.१७) सकाळी १० दरम्यान महावीर जयंती सुटीची संधीत जिल्हा शासकीय रुग्णालयातील दोन कर्मचार्‍यांनी स्क्रॅप मटेरियल लांबवत असल्याची चोरीची चित्रफित ‘आपलं महानगर’च्या हाती आली. ‘सिव्हिल कर्मचार्‍यांनीच गाठल्या चोरीच्या वाटा’ या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध करताच जिल्हा रुग्णालय प्रशासनाने कर्मचार्‍यांची चौकशीत केली. या वृत्ताने रुग्णालयात खळबळ उडाली. कर्मचारीच चोरी करत असल्याने कुंपनच शेत खात असल्याची अनुभूती रुग्ण व नातेवाईकांना आली. ही घटना घडलेली असतानाच आता चोरीचा दुसरा प्रकार उघडकीस आला आहे. नेत्रविभागात बाह्य रुग्ण व दिव्यांग रूग्णांची ओप्थाल्मास्कोप या उपकरणाच्या सहाय्याने वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी तपासणीत करत होते. तपासणी केल्यानंतर वैद्यकीय अधिकारी रुग्णांना दाखला देते होते. नेत्रविभागात रुग्ण व नातेवाईकांची गर्दी झाली. गर्दी झाल्याने वैद्यकीय अधिकारी व कर्मचार्‍यांना गर्दीवर नियंत्रण ठेवता आले नाही. नेत्रविभागातील झालेल्या गर्दीची संधीत चोरट्याने नेत्रतपासणी करणारे ओप्थाल्मास्कोप उपकरण लंपास केले. रुग्णांची तपासणी करण्यासाठी ऑप्थाल्मास्कोप उपकरणाची अधिकारी व कर्मचार्‍यांनी शोधाधोध केली. अनेक रुग्णांना विचारपूस केली. मात्र, उपकरण सापडले नाही. उपकरण सापडत नसल्याने चोरट्याने लंपास समजून शशिकांत आवारी यांनी सरकारवाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलीस हवालदार एस. बी. निकम तपास करत आहेत.

- Advertisement -

वैद्यकीय उपकरण चोरणारा सुरक्षारक्षकांना न सापडल्याने या चोरीत तेदेखील सहभागी आहेत की का, असा प्रश्न निर्माण होत आहे. रुग्णालयात सुरक्षेसाठी सुरक्षारक्षक २४ तास तैनात करण्यात आलेले आहेत. रुग्णालयात सीसीटीव्हीसुद्धा बसवण्यात आले आहेत. तरीही चोरटे दिवसाढवळ्यास स्क्रॅप मटेरियल व वैद्यकीय उपकरण लंपास करत असल्याने रुग्णालय सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -