घरमहाराष्ट्रनाशिकगड विकासाला गती; आठवडाभरात मुख्यमंत्र्यांकडून बैठक

गड विकासाला गती; आठवडाभरात मुख्यमंत्र्यांकडून बैठक

Subscribe

'आपला महानगर'ने सतत केलेल्या पाठपुराव्यानंतर प्रशासनाने केल्या हालचाली

सप्तश्रृृंगीगडावर भगवतीच्या चरणी लीन होण्यास येणार्‍या भाविकांसाठी सुमारे 20 कोटी लाख रुपयांच्या सोई-सुविधांचे विकास कामे असलेल्या आराखड्याला काल मंत्रालयात सचिवस्तरावर झालेल्या बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे. आता या खर्चाच्या कामांना अंतिम मंजुरी देण्यासाठी आठवडाभरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत बैठक होणार आहे. यात अंतिम मंजुरी मिळून प्रत्यक्षात विकासकामांसाठी निधीचा मार्ग मोकळा होणार आहे.

aapl mahanagar
आठवडाभरात मुख्यमंत्र्यांकडून गडविकास आराखड्यासाठी बैठक

भगवतीच्या दर्शनासाठी गडावर नवरात्रोत्सव, चैत्रोत्सवात मोठी गर्दी असते. त्याचबरोबर वर्षभरही भाविकांची राज्यसह परराज्यातूनही रिघ असते. मंगळवार, शुक्रवार , आणि इतर सुट्टयांच्या दिवशी गडावर भाविकांची मोठी गर्दी असते. मात्र, या भाविकांना अपुर्‍या सोई-सुविधा असतात. देवीचे दर्शन घेण्याचा उत्साह भाविकांच्या चेहर्‍यावर असल्याने येथील गैरसोईची ओरड न करता भाविक भगवतीचे दर्शन घेऊन मार्गस्थ होतात. गडावर भाविकांची व्यवस्था राखण्याची प्रमुख जबाबदारी स्थानिक स्वराज्य संस्था म्हणून ग्रामपंचायतीचे आहे. तर देवस्थानकडून भाविकांना काही मुलभुत सुविधा दिल्या जातात. पण काल झालेल्या सचिवस्तर बैठकीत बसस्थानक बांधणे, दर्शनबारी, बहुउद्देशीय सभागृह सभागृह, डोम, स्वागत कमान, पाणीपुरवठा जलवाहीनी, पथदीप, भुमिगत विद्युत तारा आदी कामांचा समावेश आराखड्यात होता.

- Advertisement -

काल झालेल्या सचिवस्ततर बैठकीत गडावर सांडपाण्यावर प्रक्रिया करून त्याचा पुर्नवापर करण्यात यावा, गडावर लावण्यात येणार्‍या सीसीटीव्ही कॅमेर्‍याचे नियंत्रण देवस्थानकडे देण्यात यावे, गडावर दिशादर्शक फलक लावण्यात यावेत. तांबुळतीर्थ ते परशुरामबाला मंदिरापर्यत पर्यायी रस्ता करण्यात यावा, त्याचबरोबर पर्यावरण पुरक विकासकामे करण्यावर भर द्यावा, महिलांसाठी जादा शौचालयांची व्यवस्था करण्यात यावी. पिण्याच्या पाण्याचा नळ फाऊंटन प्रेशर वापरण्यात यावेत,असे सूचीत करण्यात आले. तसेच सौलिड वेस्ट मॅनेजमेंटचा आराखड्यात समावेश करण्यात आला आहे. त्याचबरोबर ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांनी या आराखड्यात सुमारे आठ कोटी 52 लाख रुपयांच्या वाढीव कामांच्या शिफारशी केेलेल्या होत्या. त्यात फॉरेस्ट नाका परिसरात कमान उभारणे, वन जमीनीवर नक्षत्र उद्यान उभारणी, गडावर बंधारा बांधणे, निवारा शेड उभारणी, महिलांसाठी शौचालये आणि तांबुळतीर्थ ते परशुरामबाला देवस्थान पर्यायी मार्गाची उभारणी कामाचा समावेश होता.

गडावर प्रस्तावित विकासकामे      काम खर्च

  • सांडपाणी प्रकल्प                  1 कोटी 49 लाच
  • वृक्षारोपण                          12 लाख 55 हजार
  • सीसीटीव्ही कॅमेरे                           55 लाख
  • डोम उभारणी                      1 कोटी 54 लाख
  • गटार, रस्ते                                 50 लाख
  • संरक्षक भिंत                      7 लाख 55 हजार
  • शौचालये                          1 कोटी 53 लाख
  • वणीच्या बाजुने पायरी                     87 लाख
  • चंडीकापूर रस्ता                 1 कोटी 58 लाख
  • लोखंडी जलवाहिनी                       53 लाख
  • पाईललाईन                               24 लाख
  • कुंड पुनर्जिवन                            50 लाख
  • पथदीप                                   24 लाख
  • वीजतारा भुमिगत               1 कोटी 91 लाख
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -