घरमहाराष्ट्रनाशिककुठे बारावे खेळाडू ; तर कुठे नॉन प्लेईंग कॅप्टन

कुठे बारावे खेळाडू ; तर कुठे नॉन प्लेईंग कॅप्टन

Subscribe

जनता पार्टी आणि शिवसेनेची युती झाल्यानंतर विरोधकांच्या चेहर्‍यावर पाणी उरले नाही. काहींच्या कॅप्टनने माघार घेतली तर काही बारावे खेळाडू म्हणून रणांगणात आहेत. काही तर नॉन प्लेईंग कॅप्टन झाले आहेत, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांच्यावर प्रहार केला.

महाराष्ट्रात युतीच्या हुंकाराने विरोधकांची मती गुंग झाली आहे, असे सांगत मुख्यमंत्री म्हणाले की, या देशात मध्यंतरीच्या काळात ममता बॅनर्जींच्या नेतृत्वात बंगालमध्ये २२ पक्षांनी हात वर करून ‘हम साथ साथ है’ची घोषणा केली. तेथून बाहेर निघाल्यावर सपा, बसपाने काँग्रेसला म्हटले ‘हम आपके है कौन’, काँग्रेसनेही आम आदमीला तसेच म्हटले. ही युती तत्वशून्य होती. ती विचारांची युती नव्हती. ती केवळ खुर्चीकरता आणि मोदी हटाव नारा देण्याकरता युती होती, अशा प्रकारची युती कधीच टिकू शकत नाही. म्हणून महागठबंधन की ठकबंधन म्हणावे अशी परिस्थिती निर्माण झाली. त्यांच्यात एकमेकाला कशा प्रकारे पराभूत करता येईल यासाठी आतापासून प्रयत्न सुरू झाले आहेत. आमची युती विचारवर आधारीत आहे. यापूर्वी आम्ही एकमेकांच्या विरुद्ध लढलो असू पण हिंदूत्व आणि राष्ट्रीयत्वाचा धागा जुळवत आम्ही पुन्हा एकत्र आलो आहोत. देशाला जन्मभूमी, कर्मभूमी माननार्‍या प्रत्येकाला हिंदूत्वात स्थान आहे. शिवसेना, भाजप या महायुतीची सभा २४ मार्चला होईल असेही मुख्यमंत्र्यांनी नमूद केले.

- Advertisement -

.. तर इतिहासात अझर मसुदजी, अफजलखानजी

विरोधी पक्षातील नेते एकीकडे शहीदांना श्रद्धांजली वाहतांना दुसरीकडे आपल्या भाषणांमध्ये अझर मसुदजी म्हणतात. चुकून यांना सत्ता मिळाली तर इतिहासाच्या पुस्तकात अफजलखानजी, औरंगजेबजी, जनरल डायरजी असे वाचावे लागेल. कार्यकर्त्यांना इतकीच विनंती आहे की, समाजात यांचा चेहरा उघडा करा. आज देशाभिमाने जे लोक जगतात त्यांना जागे करा. देश असला तर आपले अस्तित्व असेल. ही सत्तेची वा खुर्चीची लढाई नाही, तर देशाकरीता हे मतदान आहे. भारत देश हा मोदींजींच्या हातात सुरक्षित आहे. भारताची जनता पुन्हा आपल्याच पाठीशी पुन्हा उभी राहणार, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

मुख्यमंत्री म्हणाले…

  • गेल्या २० दिवसांपासून मी सामना वाचतो आहे
  • युती ही फेवीकॉल का मजबूत जोड है, टुटेगा नही
  • उत्तर महाराष्ट्राच्या आठही जागा
  • निवडून आणण्याचा संकल्प करा
  • केंद्र व राज्य सरकारने गरीबांच्या
  • जीवनात गुणात्मक बदल होण्यासाठी प्रयत्न केले
  • यापुढे मोठे आव्हान दुष्काळाचे
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -