घरताज्या घडामोडीपुणे विद्यापीठ नाशिक उपकेंद्राच्या कामास लवकरच सुरुवात

पुणे विद्यापीठ नाशिक उपकेंद्राच्या कामास लवकरच सुरुवात

Subscribe

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नाशिक उपकेंद्राच्या शिवनई (ता.दिंडोरी) येथील जागेत लवकरच बांधकामास सुरुवात होणार असल्याचे आश्वासन उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिले आहे. नाशिकमध्ये त्यांनी शुक्रवारी (दि.22) उपकेंद्राच्या जागेची पाहणी केली. यावेळी खासदार हेमंत गोडसे, सीनेट सदस्य अमित पाटील, नंदू पवार उपस्थित होते.
पुणे विद्यापीठाने नाशिक उपकेंद्रासाठी शिवनई येथील 40 एकर जागेचा प्रत्यक्ष ताबा 27 ऑगस्ट 2014 रोजी मिळाला आहे. या जागेवर विद्यापीठकडून 10 हजार चौरस फूट बांधकाम केले जाणार आहे. चालू वित्तीय वर्षात विद्यापीठाच्या निधीतून दोन कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. विद्यापीठाच्या नाशिक उपकेंद्रास शासन मान्यता मिळण्यासाठी 1५ जुलै 2013 रोजी शासन स्तरावर प्रस्ताव सादर केला आहे. त्याला मंत्री उदय सामंत यांनी तत्काळ बांधकाम सुरु करण्याचे आदेश शुक्रवारी नाशिकमध्ये दिले आहेत.

Kiran Kawade
Kiran Kawadehttps://www.mymahanagar.com/author/kiran-kawade/
गेल्या १० वर्षांपासून पत्रकार म्हणून कार्यरत. राजकीय, शैक्षणिक आणि कृषी विषयांवर विपुल लेखन. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -