नाशिककरांच्या मदतीसाठी पोलिसांचा संपर्क कक्ष सुरू

Nashik
बृहन्मुंबई हद्दीत ९ मार्चपर्यंत जमावबंदी

करोनाच्या पार्श्वभूमीवर शहरात खासगी वाहनांना प्रवास व वाहतुकीस बंदी करण्यात आली आहे. मात्र, जीवनावश्यक व अत्यावश्यक सेवा यांना शहरात कर्तव्य बजावताना अडचणी येऊ नयेत, यासाठी पोलीस आयुक्तालयात संपर्क कक्ष सुरू करण्यात आला आहे. नाशिककरांना खासगी वाहनाने प्रवास व वाहतूक करताना अडचणी आल्यावर संपर्क कक्षातील अधिकाऱ्यांशी संपर्क करावा, असे आवाहन पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी केले आहे.

  1. नाशिक शहर पोलीस आयुक्तालय हद्दीत सोमवारपासून कोणत्याही रस्त्यावर सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवास व वाहतूक करण्यास मनाई करण्यात आली आहे. आदेशानुसार पोलीस, आरोग्य विभाग, अत्यावश्यक सेवा व जीवनावश्यक वस्तू तसेच आपत्ती निवारण व्यवस्थापन यांचेशी निगडित आस्थापनामध्ये कामकाज करणारे अधिकारी व कर्मचाऱ्यांना त्यांच्या कर्तव्यार्थ प्रवास करण्यास परवानगी देण्यात आली आहे. जीवनावश्यक वस्तू व अत्यावश्यक प्रसंगी शहरात खासगी वाहनातून प्रवास करताना अडचणी आल्यास संपर्क कक्षाशी संपर्क साधावा, असे पोलीस आयुक्त नांगरे-पाटील यांनी केले आहे. संपर्क कक्षात नागरिकांच्या अडचणी सोडवण्यासाठी अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

नागरिकांसाठी संपर्क क्रमांक

संपर्क कक्ष। 100, 0253-2305233/34, 231823
पोलीस निरीक्षक सीताराम कोल्हे मो. 9823788077
सहायक पोलीस निरीक्षक रघुनाथ शेगर मो.9921216577
सहायक पोलीस निरीक्षक दीपक गिरमे मो.8652224140
सहायक पोलीस निरीक्षक समाधान वाघ मो.8888805100

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here